esakal | देशात टॅलेंट असूनही भारतीय टिकटॉक का तयार होत नाही?
sakal

बोलून बातमी शोधा

tiktok

चायनिज अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामध्ये असंही विचारलं जातं की, भारत टॅलेंटच्या बाबतीत मागे नसतानाही अ‍ॅपच्या मार्केटमध्ये भारतीय अ‍ॅप्स का नाहीत.

देशात टॅलेंट असूनही भारतीय टिकटॉक का तयार होत नाही?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - चायनिज अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामध्ये असंही विचारलं जातं की, भारत टॅलेंटच्या बाबतीत मागे नसतानाही अ‍ॅपच्या मार्केटमध्ये भारतीय अ‍ॅप्स का नाहीत. याबाबत स्टेम रोबो टेक्नॉलॉजीचे सीईओ अनुराग गुप्ता म्हणतात की, आम्ही स्मार्ट क्लाससाठी काही सोल्युशन डेव्हलप केले होते. ज्यावेळी स्कूलकडे जायचो तेव्हा ते लक्ष द्यायचे नाहीत. पण जेव्हा काही परदेशी कंपन्यांनी आमच्यासोबत टायअप केलं तेव्हा आधीचं म्हणणं त्यांना पटायला लागलं. आता फक्त परदेशी कंपनीचं नावच आमच्यासोबत जोडलं गेलं होतं. एवढ्या एका गोष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. 

सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव बाइट डान्स कंपनीच्या टिकटॉक आणि टेन्सेंटच्या वी चॅटसह कॅमस्कॅनर, शेअर यासह 59 अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली. भारतात टिकटॉकचे 60 कोटी पेक्षा जास्त युजर आहेत. या वर्षी मे महिन्यात भारतात 2.2 कोटी डाऊनलोड झाले होते. मे महिन्यात जगभरात जितके टिकटॉक डाऊनलोड करण्यात आले त्याच्या 20 टक्के भारतीयांनी डाऊनलोड केलं होतं. भारतातील कोणतंही अ‍ॅप मॉनिटरिंग यादीच्या टॉप 50 मध्ये नसतं. परदेशी अ‍ॅप्सच्या सर्वात जवळ भारतीय अ‍ॅप आहे ते म्हणजे शेअरचॅट. भारतात त्याचे 15 कोटी रजिस्टर्ड युजर्स आहेत. यातील 6 कोटी युजर्स महिन्याला अ‍ॅक्टिव्ह आहेत. 

हे वाचा - फेसबुकवर तुमचा अवतार पाहिलात का? जाणून घ्या कसं तयार करायचं स्टिकर

टेक टॅलेंट भरपूर असतानाही भारतात ग्लोबल लेव्हलचा डिजिटल प्लॅटफॉर्म का तयार होऊ शकत नाही? बजाज कॅपिटलचे डिजिटल लीडर शिवकांत सिंग म्हणतात की, इंडियन अ‍ॅप इंडस्ट्री यामुळे मागे पडते कारण त्यांना दीर्घ काळासाठी आर्थिक आधार मिळत नाही. ग्लोबल अ‍ॅप इंडस्ट्री अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीवर उभा आहे. तिथं गुंतवणुकदारांना जे विश्वास देऊ शकतात की वेळेवर रिटर्न मिळू शकेल त्यांनाच पैसे दिले जातात. गुंतवणूकदार त्यांच्या कल्पना पुन्हा तशाच पुढे करतात ज्या परदेशात यशस्वी झालेल्या असतात.  व्हूकलचे सीईओ अप्रमेय राधाकृष्णन म्हणतात की, जागतिक बाजारपेठेत चालणारं अ‍ॅप भारतातही चालेल हा विचार जास्त केला जातो.  हाच विचार भारात नव्या कल्पनांवर काम करण्यास आणि त्यासाठी पैसा उभारण्यात अडथळा निर्माण करत आहेत. 

हे वाचा - बंदी न घातलेल्या PubG आणि Zoom अ‍ॅपचे आहे चीनशी कनेक्शन

स्टेम रोबोचे अनुराग यांनी सांगितलं की, अ‍ॅप डेव्हलेपमेंटमध्ये मार्केटिंगही तेवढंच महत्वाचं असतं. यासाठी पैशांची गरज असते. या वर्षी मे महिन्यात 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किंमत झालेल्या बाईटडान्सकडे मनी पॉवर आहे. तशीच ताकद व्हॉटसअ‍ॅपसाठी फेसबुक लावत आहे. युजरकडून तयार करण्यात येणाऱ्या कंटेटसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यासाठी आणि चालवण्यासाठी मोठा खर्च येतो. युजर बेसची भारतीय मार्केटमध्ये कमतरता नाही. मात्र भारतात टिकटॉक चालु शकतं तर इंडियन ब्रँड का नाही. यावेळी प्रश्न येतो तो विश्वासाचा. देशी कंपन्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामध्ये अडसर ठरतो. 

हे वाचा - चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

युजर जनरेटेड प्लॅटफॉर्मचं उत्पन्न हे जाहिरातीमधून होत असतं. भारतात डिजिटल अ‍ॅडव्हर्टायजिंग इंडस्ट्रीत 2019 मध्ये 26 टक्के वाढ होऊन ती 13 हजार 683 कोटी इतकी झाली होती. जाहिरात जगतात चीन 91.41 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या नंबरवर असून अमेरिका 242.54 अब्ज डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की व्हॉटसअ‍ॅप कसं चालत आहे. त्याला फेसबुक, ट्विटर, लिंकडइनकडून असा कोणताही फायदा मिळत नाही. फेसबुक जगभरातून पैसे कमावते. त्याचा एक भाग कोणत्याही फायद्याकडे न भगता व्हॉटसअ‍ॅपचा युजर बेस वाढवण्यासाठी खर्च केला जात आहे. मात्र लहान उद्योजकांना पैशाअभावी पुढे जाता येत नाही. 

हे वाचा - खरंच पृथ्वीचा विध्वंस करू शकतात का Asteroid ? जाणून घ्या

अ‍ॅप तायर करणाऱ्या कंपन्या लोकल मार्केटसाठी प्रोडक्ट तयार करतात. त्यांचे ग्लोबल मार्केटकडे जाण्याचे ध्येय नसते. भारतीय कंपन्यांनी फेसबुक, ट्विटरच्या तुलनेत काहीतर आणायचे म्हटले तर काय करता येईल? नवं काय देता येईल ज्यासाठी त्यांना फंडिंगची गरज पडेल.  भारतीय अ‍ॅपमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइनचे कॉम्बिनेशन दिसते. पुर्णपणे डिजिटल नाहीत. भारतातील जवळपास अर्धी लोकसंख्या ऑनलाइन आहे. अमेरिकेत इंटरनेट सुरु होऊन 26 वर्षे झाली तर भारता गेल्या 15 वर्षात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला. भारताआधी चीनमध्ये इंटरनेट सुरु झालं होतं. 

हे वाचा - आता करा स्मार्ट फेस मास्कद्वारे भाषांतर, कसे ? ते वाचा

भारतीय मानसिकतासुद्धा यामध्ये महत्वाची ठरते. बाजारात काही गोष्टी स्वस्त आणि चांगल्या मिळत असतील तर दुसऱ्या चांगल्या दर्जाच्या गोष्टी तयार करण्याची त्यांना गरजच वाटत नाही. सध्याच्या कल्पना या बिझनेस वाढवण्यासाठी नाही तर लगेच विकून श्रीमंत होण्यासाठी असतात.  आता चीनी अ‍ॅप्सवर घातलेल्या बंदीमुळे भारतीय स्टार्टअपला फायदा होऊ शकतो. आता देशात इंटरनेट प्रॉडक्ट तयार करण्याचे प्रमाण वाढू शकते. 

गेमिंग स्टार्टअप विंजोचे संस्थापक पवन नंद म्हणतात की, भारतीय लोकांनी आता चांगले प्रोडक्ट तयार करण्याची वेळ आली आहे. भारत मेक इन इंडिया अ‍ॅप्सचे मोठे केंद्र व्हावं असंही केंद्रीय मंत्र्यांनी मत व्यक्त केलं होतं. मात्र जागतिक स्तरावर भारतीय अ‍ॅप तेव्हाच धमाल करतील जेव्हा गुंतवणूकदार धोका पत्करण्यास तयार होतील.  

loading image