
Instagram Addiction : ठिके... इंस्टाग्रामच अॅडिक्शन चांगलं असतं...
Instagram Addiction : स्मार्टफोन्ससोबत आजकालची पिढी वाढते आहे म्हटल्यावर त्यांच्या आयुष्यात सोशल मीडिया खूप महत्वाचे बनले आहे अगदी लहान लहान मुलांच्याही हातात इंस्टाग्राम असते. सध्या प्रत्येक पिढी ही सोशल मिडिया वापरतांना दिसते, अशात फक्त लहान मुलांना अडवणे चुकीचे आहे कारण त्यांच्या समोर आपण मोबाइल खेळतोच आहोत.
सध्या अनेक भयावह प्रकार समोर येतात, लोकांची मानसिक स्थिती तर बिघडते आहेच, शिवाय त्यांना डिप्रेशन सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे, याहून भयावह प्रकार म्हणजे एका महिलेला कायमचं पांगळत्व येऊन तिला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतो आहे..
दरम्यान काही सर्व्हेनुसार, हे अॅडिक्शन चांगले आहे..
ऐकायला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. इंस्टाग्राममुळे लोकांच्या आयुष्यात काही चांगले बदल घडता आहेत. अर्थात अॅडिक्शन हे अॅडिक्शन असते, कितीही चांगले असले तरीही, पण यामुळे लोकांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वात भरपूर फरक पडतो आहे.
आपल्याकडे वैयक्तिक विकासावर भर दिली जात नाही, प्रत्येका माणसाची एक वेगळी बाजू असते आणि ही बाजू कोणी कधी बघतच नाही बहुदा ती व्यक्तीही त्या बाजूकडे बघत नाही. सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण जागतिक स्तरावर आपली मतं, आपल्या आवडी मांडू शकतो आणि त्याला कोणी जज करणारं नसतं किंबहुना कोणी काही बोलले तरी त्या व्यक्तीबद्दल माहिती नसल्याने फार फरक पडत नाही.
शिवाय अनेक तरुण इंस्टाग्रामवर आपले स्वतःचे vlog बनवून टाकत असल्याने त्यांना एक वेगळी फील्ड मिळाली आहे जिथून ते आपली कमाई सुद्धा करता आहेत. ते तिथे व्यक्त होता आहेत, वेगवेगळ्या ट्रेडिंग गोष्टी करत लोकं आपला स्ट्रेस रिलीफ करता आहेत.
त्यामुळे याने लोकांच्या मानसिक स्थिती वर चांगले परिणाम होता आहेत. अशात जर आपल्याला आपल्या मर्यादा माहिती असतील तर इंस्टाग्राम तितकेही वाईट नाही.