Instagram Algorithm : इन्स्टावर रील्स आणि स्टोरीज कशा होतात रँक? अल्गोरिदम बाबत सीईओंनी दिली माहिती | Instagram Algorithm For Stories and Reels how it works explains the CEO Adam Mosseri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram Algorithm Explained

Instagram Algorithm : इन्स्टावर रील्स आणि स्टोरीज कशा होतात रँक? अल्गोरिदम बाबत सीईओंनी दिली माहिती

स्मार्टफोन बाळगणाऱ्या व्यक्तींपैकी बहुतांश लोक सोशल मीडियावर असतात. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर जगभरातील कोट्यवधी लोक दिवसभर रील्स स्क्रोल करत असतात. स्वतः रील्स तयार करून पोस्ट करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र हे रील्स आपल्या फीडमध्ये कसे येतात याचा कधी विचार केलाय?

आपल्याला आपल्या आवडीनुसार रील्स दिसावेत, किंवा आपले रील्स योग्य लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी इन्स्टाग्रामचं अल्गोरिदम (Instagram Algorithm) काम करतं. रील्स आणि स्टोरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं अल्गोरिदम वापरण्यात येतं. इन्स्टाग्रामचं हे अल्गोरिदम नेमकं कोणत्या गोष्टी लक्षात घेतं, याबाबत कंपनीचे सीईओ अ‍ॅडम मोस्सेरी (Instagram CEO Adam Mosseri) यांनी माहिती दिली आहे.

अल्गोरिदम कसं करतं काम

तुम्ही इन्स्टाग्रामवर कोणत्या पेजेसना किंवा व्यक्तींना फॉलो करता, कोणता कंटेंट लाईक करता, कशावर कमेंट करता यानुसार तुम्हाला कोणते रील्स दिसतील हे ठरतं. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला फॉलो करता, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला जास्तीत जास्त त्या अकाउंटचे रील्स (Instagram Algorithm for reels) दिसतात.

कंटेंटची रँकिंग करताना इन्स्टाग्राम यूजरच्या आवडीचा विचार करतं. जर एखादी व्यक्ती रील्सपेक्षा फोटोंना अधिक लाईक देत असेल, तर तिला फोटो पाहायला आवडतं हे अल्गोरिदम समजून जातं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या फीडमध्ये रील्सच्या तुलनेत फोटो जास्त दिसू लागतात.

स्टोरी रँकिंग

इन्स्टावर रील्सपेक्षा स्टोरी पाहण्याला भरपूर लोक पसंती देतात. तुम्हाला कोणाची स्टोरी आधी दिसेल यासाठी देखील अल्गोरिदम बऱ्याच गोष्टी लक्षात घेतं. तुमची सर्च हिस्ट्री, एंगेजमेंट हिस्ट्री, लाईक्स अशा गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला अशा लोकांच्या स्टोरी आधी दाखवण्यात येतात ज्या तुम्हाला आवडतील.

रील्स रँकिंग

तुम्ही जर इन्स्टाग्राम भरपूर वापरता, तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की बहुतेक वेळा तुम्ही ज्यांना फॉलो करत नाही अशा अकाउंटचे रील्स समोर जास्त येतात. तुम्ही ज्यांना फॉलो करत आहात त्यांचे रील्स तर तुम्ही पाहणारच, असं गृहित धरून इन्स्टा तुम्हाला नवीन अकाउंट्स दाखवत राहतं.

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कंटेंटमध्ये रस आहे हे तुमच्या लाईक्स, फॉलो हिस्ट्री आणि कमेंट्सवरून लक्षात घेतलं जातं. त्यानुसार त्या प्रकारचा कंटेंट पोस्ट करणाऱ्या अकाउंट्सचे रील्स तुम्हाला दाखवले जातात.

यासोबतच, ज्या रील्सवर इतर यूजर्स अधिक रिअ‍ॅक्ट करत आहेत, त्यांची रँकिंगही वाढवली जाते. त्यामुळे लाखो लाईक्स असणारे रील्स तुम्हाला अधिक दिसतात.