आता इन्स्टाग्रामवर एक तासांचा व्हिडिओही करता येणार अपलोड

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

इन्स्टाग्रामने लाँच केलेले आयजीटीव्ही हे एक स्वतंत्र अॅप असून, स्मार्टफोन युजर ज्या पद्धतीने फुल स्क्रीन आणि व्हर्टिकली व्हिडिओ पाहू शकतात, त्याच पद्धतीने हे अॅप बनविण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : यूट्यूब आणि फेसबुकवर सध्या व्हिडिओ अपलोड करता येऊ शकतो. 30 मिनिटांहून अधिक कालावधींचे व्हिडिओही अपलोड करता येतात. मात्र, आता याला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्राम मार्केटमध्ये उतरला आहे. त्यासाठी इन्स्टाग्रामने नवे अॅप लाँच केले आहे. आयजीटीव्ही अॅप (IGTV app) असे या अॅपचे नाव असून, या अॅपच्या माध्यमातून तब्बल एक तासांचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर अपलोड करता येऊ शकणार आहे. 

instagram launches igtv app now can post long duration videos

इन्स्टाग्राम कंपनीने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हे फीचर लाँच केले. इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरविषयी अधिक माहिती व्हावी, यासाठी कंपनीच्या ब्लॉगवर सविस्तर माहितीही देण्यात आली. इन्स्टाग्रामने लाँच केलेले आयजीटीव्ही हे एक स्वतंत्र अॅप असून, स्मार्टफोन युजर ज्या पद्धतीने फुल स्क्रीन आणि व्हर्टिकली व्हिडिओ पाहू शकतात, त्याच पद्धतीने हे अॅप बनविण्यात आले आहे. 

आयजीटीव्ही अॅप हे अॅप टीव्हीसारखे असणार आहे. या अॅपला ओपन करताच व्हिडिओ प्ले होईल. त्यामुळे व्हिडिओ सर्च करण्याची गरज भासणार नाही. तसेच हे अॅप ओपन केल्यानंतर आपण ज्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करू अशा युर्जसने अपलोड केलेले व्हिडिओ पाहता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: instagram launches igtv app now can post long duration videos