Online Fraud : Instagram वर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात बुडाले 55 हजार, अशी केली फसवणूक

जसजशी नवी टेक्नोलॉजी येतेय तशीच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ
Instagram Online Frauds
Instagram Online Fraudsesakal

Instagram Tips : जसजशी नवी टेक्नोलॉजी येतेय तशीच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचं दिसतंय. सायबर फसवणुकीचं सध्या चर्चेत आलेलं प्रकरण इन्स्टाग्रामशी संबंधित आहे.

खरं तर यावेळी स्कॅमरने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवून देतो असं म्हणत 16 वर्षांच्या मुलीला गंडा घातला. त्याबदल्यात भामट्याने तिची हजारो रुपयांची फसवणूक केली.

Instagram Online Frauds
Technology Tips : दुष्काळात तेरावा महिना! गुगलने कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता प्रमोशन थांबवले

त्याचं झालं असं की, फसवणुक झालेली मुलगी तिच्या वडिलांच्या स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी इंस्टाग्राम रील्स पाहत असताना तिला सोनाली सिंह नावाच्या व्यक्तीकडून फॉलो रिक्वेस्ट आली.

यानंतर सोनालीशी तिचं बोलणं सुरू झालं. यानंतर पीडितेला इंस्टाग्रामवर ५० हजार फॉलोअर्स वाढवून देतो असं आमिष देण्यात आलं. त्या बदल्यात सोनालीने ५५ हजार रुपयांची मागणी केली.

Instagram Online Frauds
Technology Tips : Alexa आणि Google Home तुमचं 'सिक्रेट' रेकॉर्ड करू शकतात, असा डिलिट करा डेटा

QR कोड पाठवून पैसे मागितले

स्कॅमरने मुलीला QR कोड पाठवला. यानंतर मुलीने हा कोड तिच्या वडिलांच्या Google Pay खात्यातून ट्रान्सफर करण्यासाठी स्कॅन केला.

पैसे पाठवले पण तिचे फॉलोअर्स काही वाढले नाहीत. यानंतर तिने सोनालीशी बोलून पैसे परत मागितले. यावर घोटाळेबाजाने त्याला दुसरे कारण सांगून टाळले. एवढेच नाही तर घोटाळेबाजाने पैसे परत देतो असंही सांगितलं.

Instagram Online Frauds
Whats App : आता ChatGPT देणार तुमच्या व्हॉट्सअॅपवरील संदेशांना उत्तरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी शालेय विद्यार्थिनी आहे. तिने वडिलांच्या खात्यातून 8 वेगवेगळे व्यवहार केले आणि एकूण 55,128 रुपये ट्रान्सफर केले.

मुलीच्या वडिलांनी त्यांचा फोन तपासला असता त्यांचे बँक अकाऊंट रिकामे झाल्याचे त्यांना आढळले. यानंतर मुलीने वडिलांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. सर्व काही समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

Instagram Online Frauds
Chat GPT : सगळं जमलं, पण UPSC Pre पास होणं हे Chat GPT च्या तोंडचाही घास नाही!

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की ते घोटाळेबाजाचा UPI आयडी शोधत आहेत . तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय फौजदारी संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांना फोन देऊन दुर्लक्ष केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर बँकिंग अॅप्स आणि पेमेंट अॅप्स वापरत असाल तर धोका आणखी वाढू शकतो. अशा प्रकारची ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी, पेमेंट अॅप्सवर वेगळा सुरक्षा कोड टाकणे चांगले होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com