Instagram Tips : इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायचं आहे? या टिप्स तुमच्या रील्स लोकप्रिय बनवतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram Tips

Instagram Tips : इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायचं आहे? या टिप्स तुमच्या रील्स लोकप्रिय बनवतील

Instagram Tips : आजकाल बहुतेक युजर्स इन्स्टाग्राम रील्सवर त्यांची प्रतिभा आजमावत आहेत. ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात, अशावेळी ते रील बनवण्यात तासनतास घालवतात, पण एवढी मेहनत करूनही काहीच फायदा होत नाही. अशा युजर्ससाठी या टिप्स खूप उपयुक्त ठरतील. या टिप्सच्या मदतीने, तुमची रील व्हायरल होऊ शकते आणि तुम्ही इतर लोकप्रिय युजर्ससारखे प्रसिद्ध होऊ शकता. शिवाय इंस्टाग्राम रील्स बनवून लाखो रुपये कमवू शकतात.

रील बनवताना या टिप्स फॉलो करा

Text टाका : रीलच्या फीचर इमेज मध्ये शार्ट टेक्स्ट टाकणं फायदेशीर आहे. अशा प्रकारे युजर्स इंगेजेमेंट वाढते. तुम्ही त्यात कलर्ड आणि क्रिएटिव कॅपशन लिहू शकता. रीलशी रिलेटिड डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये लिहावेत. याशिवाय संबंधित टॅगिंग आणि हॅशटॅग जोडावेत.

स्टिकर्सचा वापर : इंस्टाग्राम रील्सवर कॅप्शन टाकताना, GIF आणि स्टिकर्स देखील वापरावेत. याशिवाय, तुम्ही त्यात लोकेशन टाकू शकता. अशा परिस्थितीत, आपल्या व्युवर्सना रीलच्या लोकेशन बाबतीत समजणे सोपे आहे.

एआर इफेक्टचा वापर : जर तुम्हाला चांगले रील्स बनवण्याची समज असेल, तर तुम्ही इंस्टाग्राम रील्सच्या गॅलरीमधून एआर इफेक्ट वापरावा. हे प्रसिद्ध इंस्टाग्राम क्रिएटर्सने बनवलेले असतात. येथे तुम्हाला भरपूर एआर इफेक्ट्स मिळतात.

फिल्टर्सचा वापर : इन्स्टाग्राम रील्समध्ये वेगवेगळे फिल्टर वापरल्याने तुमचा व्हिडिओ चांगला दिसेल तसेच तुम्ही त्याद्वारे प्रसिद्ध होऊ शकता. इफेक्टसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. Instagram रील्सवर डावीकडे स्वाइप केल्याने, अनेक फिल्टर उपलब्ध आहेत जे तुम्ही फ्री वापरू शकता.

ट्रेंडिंग ऑडिओ : इंस्टाग्रामवर बरीच ट्रेंडिंग गाणी आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होतात, त्यामुळे तुम्ही व्हायरल ऑडिओ किंवा गाण्याच्या क्लिपचा वापर करून रील तयार कराव्यात. तुम्ही यासाठी इंस्टाग्राम म्युझिक देखील वापरू शकता. तुम्हाला हवं असेल तर, तुमचा व्हिडिओ अधिक चांगला बनवण्यासाठी तुम्ही व्हॉइस ओव्हर वापरू शकता.

फ्रेम सेटअप : इंस्टाग्रामवर रील शूट करताना, तुम्ही नेहमी पूर्ण आकाराची फ्रेम घ्यावी. तुमची रील अशी बघून खूप छान वाटतं.