iPhone 14 Plus : Apple ने लॉन्च केला iPhone 14 चा नवा व्हेरियंट, किंमत फक्त एवढीच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone 14  Plus

iPhone 14 Plus : Apple ने लॉन्च केला iPhone 14 चा नवा व्हेरियंट, किंमत फक्त एवढीच...

iPhone 14 Plus : iPhone 14 आणि iPhone 14 Plus चा नवा व्हेरियंट लॉन्च करण्यात आलाय. मागील काही महिन्यांपासून चर्चा होती की कंपनी iPhone 14 चा नवा व्हेरियंट लाँच करणार आहे. आता कंपनीने ऑफिशियल सांगितले आहे. मुळात iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro मॅक्सचा नवा वेरिअंट आलेला नाही.

यापूर्वी कंपनीने 2018 मध्ये iPhone XR चा यलो व्हेरियंट लॉन्च केला होता. त्यानंतर Apple कंपनीने iPhone 11चाही यलो वेरिएंट सादर केला होता. (iPhone 14 Plus : Apple launch new colour variant of iPhone 14 read details new features)

मुळात स्प्रिंग सीजनमध्ये कंपनीने आपल्या iPhone चे नवे रंग कलर व्हेरियंट्स लॉन्च करत आलेले आहे. उदाहरण मागील वर्षी कंपनीने स्प्रिंग सीजनमध्ये iPhone 13 आणि iPhone 13 Pro चा अल्पाइन ग्रीन कलर व्हेरियंट लॉन्च केला होता.

नवे कलर व्हेरियंटमध्ये कलरशिवाय दुसरा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिझाइनमध्ये कोणताही चेंज नाही आणि हार्डवेयर स्पेसिफिकेशन्समध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा बदल नाही. विशेष म्हणजे किंमतही तितकीच आहे जितकी स्टँडर्ड वेरिअंटची आहे.

iPhone 14 दिसायला iPhone 13 सारखाच आहे. मात्र कंपनीने Plus व्हेरियंट लाँच केलाय. iPhone 14 Plus ची विशेष बाब ही आहे की है यामध्ये बॅटरी बॅकअप जास्त असतो. मात्र डिझाइनने एकसारखाच असतो.

iPhone 14 चा हा कलर व्हेरियंट लोकांना किती आवडणार आहे, हे पाहावे लागणार. भारतात कंपनीने होळीच्या पार्श्वभूमीवर हा यलो व्हेरियंट लॉन्च केला आहे. मात्र भारतात आता याची विक्री सुरू झालेली नाही.