Jio 5G : या नव्या शहरात Jio ची 5G सेवा सुरू, तुमच्या शहराचा समावेश आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio 5G

Jio 5G : या नव्या शहरात Jio ची 5G सेवा सुरू, तुमच्या शहराचा समावेश आहे का?

Jio 5G : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आणखी 27 शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासह, जिओ कंपनीने आतापर्यंत देशातील 331 शहरांमध्ये 5G सेवेचा विस्तार केला आहे.

रिपोर्टनुसार, कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय की Jio True 5G सेवा आता आंध्रप्रदेश, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आणि 27 शहरांमध्ये उपलब्ध आहे.

निवेदनानुसार, या 27 शहरांमध्ये Jio युजर्सना वेलकम ऑफर दिली जाईल. यात कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1Gbps पर्यंतच्या अमर्यादित डेटा मिळू शकतो. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वी घोषणा केली होती की 2023 च्या अखेरीस देशभरात Jio ची 5G सेवा सुरू होईल.

Jio आणि Airtel 5G सेवा..

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या भारतातील दोनच टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या सध्या त्यांच्या युजर्ससाठी 5G सेवा सुरू करत आहेत.

Jio True 5G मध्ये हे खास आहे..

Jio True 5G हे भारतातील एकमेव 5G नेटवर्क आहे जे 4G नेटवर्कवर शून्य अवलंबित्वासह स्टँड अलोन 5G आर्किटेक्चरवर सुरू राहतं. Jio कडे 700 MHz, 3500 MHz आणि 26 GHz बँडचे 5G स्पेक्ट्रम आहेत ज्यामुळे मजबूत नेटवर्क मिळतं.