Jio AirFiber : घरात वायफाय हवंय? Jio AirFiber सोबत मिळेल 1Gbps ची स्पीड

हल्ली आपल्याला घरी वायफाय लागतं पण कनेक्शन नेमकं घ्यायचं कोणतं याचा प्रश्न
Jio AirFiber
Jio AirFiberesakal

Jio AirFiber : हल्ली आपल्याला घरी वायफाय लागतं पण कनेक्शन नेमकं घ्यायचं कोणतं याचा प्रश्न आपल्यासमोर असतोच. आता याचं टेन्शन घेऊ नका, कारण आपल्या दिमतीला आलाय रिलायन्स जिओ.

Jio AirFiber
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

जियो सध्या सर्वात आघाडीवर असून त्याचं ५ जी नेटवर्क सर्वात फास्ट आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी झालेल्या एजीएममध्ये जिओ एअरफायबर सेवा सादर केली होती. ही सेवा वापरकर्त्यांना वायरलेस पद्धतीने फायबरसारखी सुविधा देणार असल्याचे त्याच्या नावावरून स्पष्ट होते. यासाठी कंपनी 5G अँटेना वापरणार आहे.

Jio AirFiber
Amol Kolhe Health Update: अमोल कोल्हे यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; स्वतः पोस्ट करत दिली माहिती

दरम्यान ब्रॉडबँड सेवाही जिओ पुरवत असून आता Jio ची एअर फायबर सेवा लवकरच सुरू होऊ शकते. कंपनी या सेवेचा पायलट प्रोजेक्ट चालवत आहे. यामध्ये यूजर्सना कोणत्याही फायबर केबलशिवाय 1Gbps पर्यंत स्पीड मिळेल. कंपनी ही सेवा दोन प्रकारात लॉन्च करू शकते. यात एक पोर्टेबल वायफाय पर्याय असेल, तर दुसरा फिक्स्ड व्हर्जन असणार आहे.

Jio AirFiber
Amazon Prime Video : 1 वर्षासाठी मोफत, नेटफ्लिक्सलाही या स्वस्त प्लॅनचा फायदा

वापरकर्ते Jio AirFiber वर 1Gbps पर्यंत स्पीड मिळवू शकतात. मात्र ही सेवा सुरू करण्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच ही सेवा सुरू करू शकते. एक-दोन महिन्यांत ही सेवा सुरू होईल, अशी शक्यता असून चला तर जाणून घेऊया Jio AirFiber बद्दल..

Jio AirFiber
Tata Harrier : टाटा हॅरियर फेसलिफ्टबद्दल 5 खास गोष्टी, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत

किंमत किती?

जिओची ही सेवा जून किंवा जुलैमध्ये सुरू होऊ शकते. याचा व्हिडिओही यूट्यूबवर आहे. ज्यात Jio AirFiber चे अनबॉक्सिंग आणि इंस्टॉलेशन दाखवले गेले आहे. कंपनी काही काळापासून या सेवेचा पायलट प्रोजेक्ट अंतर्गत चाचणी करत आहे. व्हिडिओनुसार, ही सेवा दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

Jio AirFiber
Tata Group: टाटा ग्रुपची 'ही' कंपनी घेणार 10 हजार कोटींचे कर्ज! जाणून घ्या काय आहे योजना

यामध्ये पोर्टेबल वाय-फाय राउटर उपलब्ध असेल. आणखी एक नॉन-पोर्टेबल आवृत्ती असेल, जी Wi-Fi 6 सपोर्टसह येईल. त्याची किंमत ५,५०० ते ६००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही.

Jio AirFiber
Maruti Suzuki 7 Seater Car : जुलै मध्ये येईल मारुती सुझुकीची नवीन 7 सीटर कार

दोन्ही मॉडेल व्हिडिओमध्ये दाखवले असून Jio AirFiber वायफाय राउटरसह येत आहे, ज्यामध्ये एक अँटेना म्हणून काम करेल तर दुसरा एक्सटेंडर म्हणून काम करेल. तुम्हाला एक राउटर तुमच्या छतावर किंवा इतर कोणत्याही उंच ठिकाणी ठेवावा लागेल, तर दुसरा घराच्या आत ठेवावा लागेल.

Jio AirFiber
SUV launch : यंदा बाजारात येणार तीन नव्या एसयूव्ही

हार्डवेअर इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला नेटवर्क कनेक्शन जोडून इन्स्टॉलेशन पूर्ण कराव लागेल. यावेळी, तुम्हाला आधी एअरफायबरमध्ये Jio 5G सिम टाकावे लागेल. त्यानंतर Jio Home अॅप डाउनलोड करुन तुम्हाला Jio Fiber राउटरशी कनेक्ट करावे लागेल आणि नंतर WiFi पासवर्ड टाकावा लागेल, जो राउटरच्या खालच्या बाजूला असेल.

Jio AirFiber
Health Tips : हरभऱ्यांमुळं राहील Blood Sugar नियंत्रणात

वायरलेस कनेक्शन व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना Jio AirFiber मध्ये USB पोर्ट, एक LAN आणि WAN पोर्ट मिळेल. युजर्सना हवं असल्यास, ते सेट-टॉप बॉक्स Jio AirFiber शी कनेक्ट करू शकतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com