Jio Extends 5G Coverage : देशातील आणखी २७ शहरांमध्ये मिळणार जियोची 5G सेवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio 2 5G

Jio Extends 5G Coverage : देशातील आणखी २७ शहरांमध्ये मिळणार जियोची 5G सेवा!

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आणखी २७  शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासह, जिओने आतापर्यंत देशातील ३३१ शहरांमध्ये 5G सेवांचा विस्तार केला आहे.कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली. 

'Jio True 5G' आता आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल, यासारख्या राज्यांमधील २७ शहरांमध्ये उपलब्ध आहे. 

कंपनीच्या निवेदनानुसार, ८ मार्च २०२३ पासून या २७ शहरांमध्ये जिओ वापरकर्त्यांना 'वेलकम ऑफर' दिली जाईल. या अंतर्गत, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 Gbps पर्यंतच्या वेगाने अमर्यादित डेटा मिळू शकतो. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, २०२३ च्या अखेरीस Jio ची 5G सेवा देशभरात पसरेल. 

काय फायदा होणार ? 

5 जी तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (AR) आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी  (VR) सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे आरोग्यसेवा, शिक्षण, शेती आणि राष्ट्र-निर्माण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगांचा मार्ग मोकळा होईल. 


Jio चे प्रवक्ते म्हणाले, "२०२३ मध्ये प्रत्येक Jio वापरकर्त्याने Jio True 5G तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय फायद्यांचा आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत, Jio True 5G देशातील प्रत्येक गाव व शहर कव्हर करेल."

टॅग्स :Jioreliance jioJio Users