रिलायन्स जिओचा खास रिचार्ज प्लॅन; मिळतात जबरदस्त बेनिफिट्स

Jio
JioGoogle

1 डिसेंबर 2021 पासून रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत. जिओचे प्लॅन तब्बल 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. यासोबतच जिओने काही नवीन वैधता प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. या व्यतिरिक्त जिओने सध्या त्यांच्या बहुतांश प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देणे बंद केले आहे. जिओच्या वेबसाइटनुसार, आता डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन जिओच्या फक्त एकाच प्लॅनमध्ये दिले जात आहे. जिओचा हा प्लॅन 601 रुपयांचा आहे. चला तर मग जाणून घेऊया जिओच्या या प्लॅनमध्ये इतर कोणते फायदे आहेत.

601 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 601 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी फ्रीमध्ये उपलब्ध आहे. किंमत वाढण्यापूर्वी जिओचा हा प्लॅन 401 रुपयांचा होता. Jio च्या 601 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.

Jio
डिसेंबर महिन्यात लॉंच होतयत 'हे' दमदार स्मार्टफोन्स; पाहा डिटेल्स

मिळेल एकूण 90GB डेटा

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. याशिवाय प्लॅनमध्ये 6GB एडिशनल डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 90GB डेटा देण्यात आला आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय प्लॅनमध्ये Jio अॅप्स (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud) चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.

Jio
आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच येतोय खिशाला परवडणारा 5G iPhone

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com