
Jio Best Offer : जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, एक वर्षासाठी मिळतं अॅमेझॉन प्राइम अन् नेटफ्लिक्स फ्री!
पोस्टपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओने अलीकडेच जिओ प्लस प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते.
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओकडे आधीपासूनच 1499 आणि 999 रुपयांचे प्लॅन आहेत. या पोस्टपेड प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन्स देण्यात येतात. चला या पोस्टपेड प्लॅन्सबद्दल सर्व काही जाणून घेऊयात..
रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 1499 रुपयांच्या प्लॅनची वैधता एक बिल सायकल आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 300GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, ग्राहकांना प्रति जीबी 10 रुपये शुल्क द्यावे लागेल. रिलायन्स जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त सिम कार्ड दिले जात नाही.
जिओ पोस्टपेड प्लसच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल्सची ऑफर दिली जाते. म्हणजेच, ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित स्थानिक, एसटीडी कॉल करू शकतात. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात.
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय JioTV, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश देखील या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.
यूएसए आणि यूएई ग्राहकांसाठी या जिओ प्लॅनमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंग सुविधा देखील उपलब्ध आहेत.
रिलायन्स जिओचा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची वैधता एक बिल सायकल आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी शुल्क आकारले जाते. या प्लॅनमध्ये एकूण 500GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील आहे. जिओचा हा पोस्टपेड प्लॅन फॅमिली प्लॅन अंतर्गत सूचीबद्ध आहे म्हणजेच ग्राहक या प्लॅनसह 3 अतिरिक्त सिम कार्ड देखील जोडू शकतात.
रिलायन्स जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम सारख्या OTT प्लॅटफॉर्मची मोफत मेंबरशिप देखील मिळते. Jio चा हा पोस्टपेड प्लॅन JioTV, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये Amazon प्राइम मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत दिली जाते. या प्लॅनमध्ये 5G वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा दिला जातो.