Unknown Number वरच्या कॉलमुळे वैतागला आहात, मग या टिप्सने अनोळखी कॉल्सचा पत्ता करा कट

गेल्या काही वर्षांमध्ये फ्रॉड म्हणजेच वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळ्याचं प्रमाणही वाढू लागलं आहे. हे Unknown नंबरवरून येणारे कॉल तुम्हाला कमी किंवा बंद करायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत
अनोळखी काॅल्स दूर ठेवा
अनोळखी काॅल्स दूर ठेवाEsakal

एकीकडे तंत्रज्ञान प्रगत होत असल्याचा दैनंदिन जीवनात फायदा होत असताना काही वेळी या तंत्रज्ञानामुळे Technology अडचणीदेखील निर्माण होतात. यामध्ये मोबाईलचा विचार करता. मोबाईलमुळे सध्या जग जोडलं गेलंय असं म्हणायला हरकत नाही. केवळ एका कॉलने Mobile Calls किंवा आता तर व्हिडीओ कॉलने साता समुद्रापार असलेल्या व्यक्तीशी संवाद साधणं तिला पाहणं शक्य झालं आहे. Keep Unwanted and Unknow calls from your mobile

काही वर्षांपूर्वी मोबाईलवर Mobile केवळ नातलगांचे किंवा परिचित व्यक्तींचे कॉल येत मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान अॅन्ड्रॉइड Android आणि iOs च्या काळात मोबाईलवर अनेक अनोखळी किंवा Unknown नंबरहून कॉल येण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. अनेकदा एखाद्या विचित्र नंबरवरुन कॉल आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यातील अनेक कॉल हे मार्केटिंग, सेल्स कंपन्यांचे असतात.

तर गेल्या काही वर्षांमध्ये फ्रॉड म्हणजेच वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळ्याचं प्रमाणही वाढू लागलं आहे. हे Unknown नंबरवरून येणारे कॉल तुम्हाला कमी किंवा बंद करायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. यामुळे Unknown नंबरवरून येणारे फ्रॉड कॉल्स ओळखणं किंवा त्यांचा पत्ता कट करणं सोयीचं होईल.

Unknown इनकमिंग कॉल ब्लॉक करा-

प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये unknown incoming calls block हा पर्याय देण्यात आलेला असतो. मात्र अनेकांना याबद्दल कल्पना नसते. जर तुम्ही ही फिचर अॅक्टिवेट केलं तर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल्स येणं बंद होऊ शकतं.

जेव्हा कुणी unknown नंबरवरून तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा हे फिचर तो नंबर ब्लॉक करून टाकेल. यामुळे पुन्हा त्या नंबरवरून कधीच कॉल लागू शकणार नाही. यासाठी तुम्हाला काही सध्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

यासाठी तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा.

यानंतर Privacy या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर कॉल सेटिंगमध्ये जा.

Block numbers चा पर्याय निवडा.

इथे तुम्हाला Block All Calls From Unknown Numbers आणि block spam and spam calls असे पर्याय दिसतील. यातील तुम्ही हवा असलेला पर्याय किंवा दोन्ही पर्याय ऑन करू शकता.

यामुळे तुम्हाला येणारे अननोन नंबर्सवरील कॉल तसचं फ्रॉड कॉल येणं बंद होईल.

हे देखिल वाचा-

अनोळखी काॅल्स दूर ठेवा
Mobile Tracking Portal: चोरीला गेलेल्या फोनचा विषय सोडून देऊ नका? भारत सरकार शोधून देतंय तुमचा फोन!

मोबाईलवर DND सर्विस एक्टेवेट करा

तुम्ही कोणत्याही कंपनीचं सिम कार्ड वापरत असलात तरी तुम्हाला प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून DND service देण्यात येते. DND म्हणजेच Do Not Disturb. ही सर्विस ऑन केल्याने तुम्हाला कंपन्यांचे नको असलेलं कॉल्स येणं बंद होईल. ही सर्विस सुरु करण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा.

यासाठी तुम्हाला सर्विस प्रोव्हायडरच्या कस्टमर केअरला कॉल करावा लागेल.

यानंतर कस्टमर केअर अधिकाऱ्याला तुमच्या नंबरवर DND सर्विस एक्टिवेट करण्यासाठी सांगा.

यावेळी तुम्ही तुम्हाला गरजेचे वाटणारे बँक किंवा इतर पॉलिसीचे कॉल आणि मेसेजेस सुरु ठेवण्यासाठी सांगू शकता.

तुमच्या रिक्वेस्टनुसार तुमच्या मोबाइल नंबरवर ही सेवा सुरु करण्यात येईल.

DND सर्विस सुरू झाल्यानंतर तुम्हाला येणारे ऑफर्ससंबंधित कॉल आणि मेसेजेस बंद होतील.

कॉल ब्लाॅकर ऍपचा वापर

फोनच्या सेटिंगमधून Call block केल्यानंतरही किंवा DND सर्विस ऍक्टिवेट केल्यानंतरही जर तुम्हाला काही नको असलेले किंवा Unknown नंबरवरून कॉल येत असतील तर तुम्ही काही Apps च्या मदतीने हे कॉल ब्लॉक करू शकता. प्लेस्टोरमधून तुम्ही Call Blocker चे एखादे ऍप डाउनलोड करू शकता. हे ऍप मोबाईलमध्ये इनस्टॉल केल्यानंतरही अनावश्यक कॉल तुम्ही ब्लॉक करू शकता.

ट्रू कॉलरवर करा ब्लॉक

याशिवाय तुम्ही truecaller appच्या मदतीनेही नको असलेल्या कॉलला ब्लॉक करू शकता. एखादा अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलची माहिती तुम्ही या ऍपमध्ये तपासू शकता. कॉल आलेला नंबर कुणाचा आहे. तो स्पॅम किंवा फ्रॉड आहे हे तुम्ही इथे तपासू शकता. तसचं इथूनच तुम्ही तो नंबर ब्लॉकही करू शकता.

अशा प्रकारे काही सेटिंग आणि ऍप्सच्या मदतीने तुम्ही Unknown कॉलपासून सुटका मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com