esakal | स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचंय, वापरा हे फिटनेस मोबाइल ॲप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Fitness App

स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचंय, वापरा हे फिटनेस मोबाइल ॲप्स

sakal_logo
By
टीम ईसकाळ

कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) बहुतेक लोक सध्या घरून काम करत आहेत. यामुळेच प्रत्येकावर शारीरिक आणि मानसिक ताण वाढत आहे. परंतु व्यायामाद्वारे हा ताण मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. आज आपण काही उत्कृष्ट फिटनेस मोबाइल अ‍ॅप्सबद्दल (Fitness App) जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण घरीच व्यायाम करुन स्वतःला फिट ठेवू शकाल. (know best home workout app in play store marathi article)

Workout for Men at Home

हे मोबाइल ॲप खासकरुन पुरुषांना घरी व्यायामासाठी बनवले गेले आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला शरीराच्या प्रत्येक भागासाठी व्यायामाचा चार्ट मिळेल. ॲपमध्ये कोणत्याही व्यायामाच्या प्लॅनसाठी आपल्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच आपण स्वत:चे लेवल निवडून व्यायाम करू शकता. या ॲपचे गूगल प्ले स्टोअरवर रेटिंग 4.4 आहे आणि त्याची साईज 28MB आहे.

होम वर्कआऊट

होम वर्कआउट मोबाइल अ‍ॅप दररोज एक वर्कआउट प्लॅन देते. यात आपण आपल्या स्वत: च्या आवडीनुसार एक प्लॅन तयार करू शकता. तसेच हे ॲप आपल्या फिटनेसचा रेकॉर्ड ठेवते. यात तपशीलवार व्हिडिओ आणि अ‍ॅनिमेशन गाईजची सुविधा देखील दिली आहे. या व्यतिरिक्त या ॲपमध्ये आपणास फॅट बर्निंग आणि एचआयआयटी वर्कआउट प्लॅन देखील मिळेल. या अ‍ॅपचे गूगल प्ले स्टोअरवर रेटिंग 4.9 आहे.

हेही वाचा: जुन्या बाईकचं मायलेज कमी झालंय? या टिप्सचा करा वापर; परफॉर्मन्स होईल दमदार

30 Day Fitness Challenge

30 डे फिटनेस चॅलेंज ॲपचे गूगल प्ले स्टोअरवर रेटिंग 4.8 आहे. त्याचा आकार 20MB आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला व्हिडिओ गाईडची सुविधा मिळेल. तसेच यात 30 डे फुल बॉडी चॅलेंज सारखे मोड्स देण्यात आले आहेत. यामध्ये आपण आपला फिटनेस रेकॉर्ड सोशल मीडियावर देखील शेयर करू शकता.

Fastic Fasting App

या मोबाइल ॲपच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे वजन कमी करु करू शकतात. त्यानंतर त्यांना व्यायामाचे अनेक पर्याय या ॲपमध्ये सुचविले जातात. त्याच वेळी, वापरकर्ते चांगले आरोग्य, डीटॉक्स, दीर्घायुष, अधिक ऊर्जा हे प्रयाय देखील निवडू शकतात.

(know best home workout app in play store marathi article)

हेही वाचा: Google Pay ला टक्कर देण्यासाठी येतोय WhatsApp Pay!