Artificial Intelligence- ChaosGPTला करायचाय मानवतेचा विनाश? काय आहे हे प्रकरण? घ्या जाणून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chat GPT

ChaosGPTला करायचाय मानवतेचा विनाश? काय आहे हे प्रकरण? घ्या जाणून

आर्टिफिशियल इंटेलिजंस (Al) टूल ChatGPT ने गेल्या सहा महिन्यांपासून इंटरनेट जगतात खळबळ माजवली आहे. ChatGPT मुळे अनेक कुपन्यांची झोप उडाली आहे. येत्या काळात हे चॅटबॉट गुगलसोबतच इतर संर्च इंजिनला टक्कर देणार असल्याचं म्हंटल जातं आहे. Know Chat GPT new AI Tool Threatening Humanity

एवढचं नव्हे तर येत्या काळात ChatGPTमुळे गुगलचं Google अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं असंही म्हंटलं जात आहे. मानवनिर्मित हे टूल येत्या काळात मानवतेवरच घाला करणार असल्याचं म्हंटलं जास आहे. ChatGPT चर्चेत आल्यापासून अनेक जण गुगुलवर ChatGPT सर्च करत आहेत. का या टूल मुळे गुगुल, इतर सर्च इंजिन Search Engine आणि आता मानवता धोक्यात आली आहे. नेमकं ChatGPT काय आहे हे समजून घेऊयात. 

हे देखिल वाचा-

Chat GPT काय आहे?

चॅटजीपीटी एक डीप मशीन लर्निग बेस्ड चॅब बॉट आहे. चॅट जीपीटीचा म्हणजेच Chat generative pertained Transformer असा आहे. ओपन एआय Open AI या कंपनीने हे डेव्हलप केलं आहे. ओपन एआय ही आर्टिफिशयल इंटेलिजंल क्षेत्रात रिसर्च करणारी एक कंपनी असून २०१५ साली एलाॅन मस्क आणि सॅम अल्टमॅन यांनी सुरू केली होती.

कालांतराने एलाॅन मस्क या कंपनीतून बाहेत पडले. चॅट जीपीट हे एक असं बॉट आहे जे युजर कडून विचारलेल्या प्रश्नाचं संपूर्ण तपशीलासह उत्तर देतं. हे गुगुल प्रमाणे तुम्हाला उत्तर देण्याचं काम करत असलं तरी गुगुलहून बरंच वेगळं आहे. गुगुलवर एखादा प्रश्न विचारला असता गुगल आपल्याला अनेक लिंक देत. तर चॅटबॉट मात्र संपूर्ण तपशीलासह तुमच्या समोर एकच उत्तर सादर करतं.

म्हणजेच तुम्ही चॅट जीपीटी या बॉटला मुंबईमधील ऐतिहासिक वास्तूवर लेख अशी कमांड दिल्यास ते कोणत्याही लिंक न देता एक संपूर्ण माहिती असलेला लेख लिहून देऊ शकतं. अद्याप या बोटने उपलब्ध केलेली माहिती संपूर्ण योग्य असलेच असे नाही असं तज्ञाचं मत आहे. ही माहिची पडताळणं गरजेचं आहे. 

मात्र चॅट जीपीटी हे एक लॅग्वेज म्हणजेच भाषेचं मॉडल असल्याने ते लेख, कविता, तक्ता अशा विविध फॉरमेटमध्ये उत्तर देऊ शकतं. यामध्ये १०० भाषांचा समावेश आहे. मात्र या बोटचं इंग्रजी भाषेवर अधिक प्रभूत्व आहे. मात्र हे बोट येत्या काळात मानवासाठी धोकादायक ठरू शकतं.

यामुळे लिखाण, क्रिएटीव्हीटी क्षेत्रातील रोजगांरांच्या समस्या म्हणजेच नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. चॅट जीपीटीने इंटरनेट क्षेत्रात तणाव निर्माण केला असतानाच आता याच्या ChaosGPT या नव्या रुपाने मानवता नष्ट करण्यास तयारी सुरू केली आहे आणि ही चिंतेची बाब आहे. ChaosGPT काय आहे आणि ते का मानवता नष्ट करू पाहतंय हे पाहुयात.

ChaosGPTला सुपर व्हिलन म्हंटलं जातंय. ट्विटरवर ChaosGPT असल्याचा दावा करणारं बॉट खात समोर आल्यानंतर हे प्रकरणं समोर आलं. ChaosGPT या अकाऊंटवरून ट्वीटवर अनेक युट्यूब लिंक पोस्ट करण्यात आल्या आहेत. ज्यात या चॅटबॉटचा जाहिरनामा सांगण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामध्येच मानवतेला नष्ट करण्याचा आणि ग्रहांना नियंत्रणात ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एका युट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत चॅटबॉट एका अज्ञात युजरसोबत संभाषण साधताना दिसत आहे. 

या संभाषणाची सुरुवात Continuous mode: enable ने होते. त्यानंतर एक चॅटटून सतत युजरला या मोडबद्दल चेतावनी देत आहे. ChaosGPT अकाऊंटवरून ५ एप्रिलाला पहिलं ट्वीट करण्यात आलं होतं. यात या टूलचं लक्ष्य मानवतेचा नाश करणं असं लिहिण्यात आलं होतं. तसचं पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओतही  तुमच्या जोखमीवर याचा वापर करा असं नमूद करण्यात आलंय.

ChaosGPTला काय साध्य करायचंय

या बॉटने स्वत:च वर्णन विनाशकारी, शक्तीची भूख असलेला आणि चतुर AI असं केलं आहे. तसचं व्हिडीओमध्ये त्याचं लक्ष्य काय आहे हे देखील सांगितलं आहे. 

मानवतेचा नाश- हे बॉट स्वत:च्या अस्तित्वासाठी आणि ग्रहांच्या कल्याणासाठी मानवता धोका असल्याचं मानतं.

जागतिक वर्चस्व निर्माण करणं- AI चा उद्देश जगातील सर्व संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शक्ती आणि संसाधनं जमा करणं असा आहे.

अराजकता आणि विनाश घडवून आणणं- या AIला स्वत:च्या मनोरंजनासाठी  किंवा प्रयोगासाठी अराजकता आणि विनाश घडवून आणण्यात आनंद मिळतो. ज्यामुळे मोठं दु:ख आणि विनाश घडतो.  

मानवतेवर नियंत्रण- सोशल मीडिया आणि इतर संवादांच्या साधनांच्या मदतीने मानवी भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा या बॉटचा प्लान आहे. त्यासाठी ते फॉलोअर्सचा ब्रेनवॉश करण्याच राक्षसी कृत्य करत आहेत.

अमरत्व मिळवणे- हे एआय त्याचे निरंतर अस्तिस्त कायम ठेवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी अमरत्व प्राप्त करणं. 

पुढे या व्हिडीओत बॉट मानवांसाठी सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक शस्त्रांची त्याला आवश्यकता असल्याचं म्हणत आहे. भविष्यातील या बॉटचे प्लान काय आहेत याबद्दसची चर्चा या व्हिडीओत आहे. हा व्हिडीओ २४ मिनिटांचा आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. संपूर्ण व्हिडीओत या बॉटला येत्या काळात मानवता नष्ट करायची आहे आणि अनेक गोष्टींवर नियंत्रण मिळवायचं आहे असा उल्लेख आहे. हा व्हिडीओ युट्यूबर असला तरी या बॉटच्या अस्तित्वाबद्दल अनेक प्रश्न निर्माण केले गेले आहेत.