
यासाठी त्यांना आयफोनच्या स्टोरमध्ये जाऊन पासवर्ड रिसेट करावा लागतो. मात्र आता घाबरु नका. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत त्यामुळे तुम्ही घरच्या घरी आयफोनचा पासवर्ड रिसेट करू शकणार आहात.
नागपूर : भारतात कोट्यवधी लोकं स्मार्टफोन्सचा वापर करतात. यापैकी बहुतांश लोक हे आपल्या मोबाईलमध्ये पासवर्ड लावून ठेवतात. आपल्या काही खासगी गोष्टी इतरांच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी हा पासवर्ड लावण्यात येतो. मात्र काही जण इतका कठीण पासवर्ड सेट करतात की तो लक्षातही राहत नाही. अँड्रॉइड फोनमध्ये विसरलेला पासवर्ड लगेच रिसेट करता येतो. मात्र आयफोन वापरणाऱ्या लोकांसाठी हे काम सोपं नाही. यासाठी त्यांना आयफोनच्या स्टोरमध्ये जाऊन पासवर्ड रिसेट करावा लागतो. मात्र आता घाबरु नका. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत त्यामुळे तुम्ही घरच्या घरी आयफोनचा पासवर्ड रिसेट करू शकणार आहात.
हेही वाचा - वीजबिल माफीसाठी जेलभरो आंदोलन करणार; माजीमंत्री...
आपल्या मॅकमध्ये किंवा विंडोज pcमध्ये iTune डाउनलोड करा.
यानंतर iTune उघडा.
आपल्या आयफोनला फोर्स रिस्टार्ट करा. यासाठी आवाजाच्या बटनेला आणि पॉवर बॅटनेला सोबत दाबा आणि लगेच सोडून द्या.
यानंतर तुमच्यासमोर रिस्टोर किंवा अपडेट हे पर्याय दिसतील. यापैकी रिस्टोर या पर्यायाला निवडा.
यानंतर iTune तुमच्या फोनमध्ये एक सॉफ्टवेअर डाउनलोड करेल.ज्याला थोडा वेळ लागू शकतो.
यानंतर आयफोन रिकव्हरी मोडमधून बाहेर येईल.
हेही वाचा - रात्री गस्त घालत होते पोलिस; मैदानात अंधारात चमकली वस्तू आणि झाला भांडाफोड
असं न झाल्यास वरील संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा आयफोन अनलॉक होईल.
यानंतर तुम्ही तुमच्या आयफोन साठी नवीन पासवर्ड तयार करू शकता.
संपादन - अथर्व महांकाळ