esakal | Pulse Oximeter विकत घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

Pulse Oximeter

Pulse Oximeter विकत घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ब्लड ऑक्सिजन मॉनिटरला पल्स ऑक्सिमीटर म्हणून ओळखले जाते, ज्याची सध्याच्या काळात मागणी वाढली आहे. सध्या पल्स ऑक्सिमीटर ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. कोरोनाव्हायरस पॉझिटीव्ह रूग्णासाठी रक्ताचा ऑक्सीमीटर आवश्यक आहे. याव्यतिरिक्त दम्याचा त्रास, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (सीओपीडी) किंवा फुफ्फुसांच्या इतर आजार असलेले रुग्ण देखील घरी ब्लड ऑक्सीमीटर ठेवतात. अशा परिस्थितीत रक्त ऑक्सिमीटर खरेदी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

बाजारात तीन प्रकारचे Pulse Oximeter उपलब्ध आहेत

पल्स ऑक्सिमीटर प्राथमिक टप्प्यात कोरोना रूग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मोजण्यासाठी वापरले जाते. बाजारात तीन प्रकारचे Pulse Oximeter आढळतात. यात फिंगरटिप पल्स ऑक्सिमीटर, हँडहेल्ड ऑक्सिमीटर आणि fetal पल्स ऑक्सिमीटरचा समावेश आहे. fingertip pulse oximeter खरेदी करणे एक चांगला पर्याय आहे. हँडहेल्ड ऑक्सिमीटर आणि fetal पल्स ऑक्सिमीटरचा वापर मुख्यत्वे रुग्णालय आणि क्लिनिकल वापरासाठी केला जातो.

या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

  • फिंगर पल्स ऑक्सिमीटरची सुरुवातीची किंमत 1000 रुपये आहे, जी 5000 रुपयांपर्यंत जाते. पल्स ऑक्सिमीटर खरेदी करताना आपण यापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. त्याचे का्म फर् बल्ड ऑक्सिजन पातळी मोजणे एवढेच आहे.

  • वापरकर्त्यांनी नेहमी अधिकृत वेबसाइटवरून पल्स ऑक्सिमीटर खरेदी करावी.

  • फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास नेहमीच ब्राइट आणि क्लिअर डिस्प्ले असणारा ब्लड ऑक्सिमीटर खरेदी केले पाहिजे. शक्य असल्यास वापरकर्त्यांनी वॉटर रेजिस्टंट फीचर असणारे ब्लड ऑक्सिमीटर खरेदी केले पाहिजे.

  • रक्तातील ऑक्सिजनची पातळी बर्‍याच पल्सऑक्सिमीटरमध्ये दिली जाते. तसेच हर्ट रेट रिडींग फीचर उपलब्ध असल्यास ते अधिक चांगले होईल.

  • पल्स ऑक्सिमीटरमध्ये अचूकतेकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. मात्र अचूकता मोजण्याचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे उत्पादनाचे रिव्ह्यू आणि सर्टिफिकेट्स तपासणे हा सर्वात चांगला मार्ग आहे.

  • वापरकर्त्यांनी एFDA, RoHS और CE सर्टिफिकेशन असणारे ब्लड ऑक्सिमीटरच खरेदी करावे.

loading image
go to top