तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्ट आहे का? 'अशा' प्रकारे जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5G network

तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्ट आहे का? 'अशा' प्रकारे जाणून घ्या

भारतातील तीन प्रमुख दूरसंचार ऑपरेटर Jio, Airtel आणि Vi लवकरच त्यांच्या 5G सेवा भारतात सुरू करण्याच्या तयारीत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार Jio आणि Airtel त्यांच्या 5G सेवा लवकरच सुरू होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सांगितले होते की 5G लवकरच येत आहे आणि 4G सेवांच्या तुलनेत त्याचा वेग 10X असेल. त्यामुळे सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

आता 5G भारतात केव्हाही लॉन्च होऊ शकतो. अशा परिस्थितीत हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे 5G सपोर्टेड स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. मग तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो की नाही हे तुम्ही कसे तपासाल? आता, जर तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत नसेल, तर तुम्हाला 10X स्पीड अनुभवण्यासाठी नवीन फोन घ्यावा लागेल.

तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो की नाही हे कसे तपासायचे?

  • तुमच्या Android फोनवर, सेटिंग्ज अॅपवर जा

  • 'वाय-फाय आणि नेटवर्क' ऑप्शनवर क्लिक करा

  • आता 'सिम आणि नेटवर्क' पर्यायावर क्लिक करा

  • आता तुम्ही ‘Preferred network type’ पर्यायाखालील सर्व टेक्नोलॉजीची लिस्ट पाहू शकाल

  • तुमचा फोन 5G ला सपोर्ट करत असल्यास, तो 2G/3G/4G/5G म्हणून लिस्ट केलेला असेल.

हेही वाचा: Realme 9i 5G भारतात लॉन्च, कमी किमतीत मिळतायत दमदार फीचर्स

तुमचा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत नसल्यास, तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेण्यासाठी 5G-सक्षम स्मार्टफोन विकत घ्यावा लागेल. Realme, Xiaomi सारख्या अनेक फोन कंपन्या आहेत, ज्या आधीच परवडणारे 5G स्मार्टफोन ऑफर करतात. एका नवीन मीडिया रिपोर्टनुसार, Qualcomm ने अलीकडेच सांगितले की भविष्यात 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 5G फोन उपलब्ध होतील. आता, तुम्ही 5G फोनवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, तुमचे नेटवर्क 5G ला सपोर्ट करत असल्याची खात्री करून घ्या.

हेही वाचा: मारुतीची नवीन Alto K10 लाँच; देते 25km मायलेज