'चांद्रयान-2'च्या नेतृत्वसाठी 'त्या' दोघींही सक्षम 

सम्राट कदम 
रविवार, 14 जुलै 2019

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) "चंद्रयान-2' मोहिमेच्या समन्वयाचे काम एम. वनिता आणि रितू करिधल अत्यंत जबाबदारीने करत आहेत. भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या इतिहासात प्रथमच दोन महिला शास्त्रज्ञ करत आहे. देशाच्या पहिल्या महिला क्षेपणास्त्र वैज्ञानिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करिधल यांच्याकडे 'मोहीम संचालक' (मिशन डायरेक्‍टर) म्हणून जबाबदारी आहे. तर वनिता यांच्याकडे 'प्रकल्प संचालक' (प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर) म्हणून जबाबदारी आहे.

पुणे : 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाती उद्धारी' असा सुविचार मराठीत नेहमी म्हटला जातो. त्याची प्रचिती आता चांद्रयानाच्या निमित्ताने येत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) "चंद्रयान-2' मोहिमेच्या समन्वयाचे काम एम. वनिता आणि रितू करिधल अत्यंत जबाबदारीने करत आहेत. भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या इतिहासात प्रथमच दोन महिला शास्त्रज्ञ करत आहे.

देशाच्या पहिल्या महिला क्षेपणास्त्र वैज्ञानिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करिधल यांच्याकडे 'मोहीम संचालक' (मिशन डायरेक्‍टर) म्हणून जबाबदारी आहे. तर वनिता यांच्याकडे 'प्रकल्प संचालक' (प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर) म्हणून जबाबदारी आहे. कगिधल यांनी लखनौ विद्यापीठातून 'एम.एस्सी' आणि पुढे 'भारतीय विज्ञान संस्थान' (आयआयएससी) मधून 'एरोस्पेस' विषयात एम टेक पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या 1997 मध्ये इस्त्रोत दाखल झाल्या. त्यांच्याकडे मंगळ मोहिमेची सहसंचालक म्हणून जबाबदारी होती. मंगळयानाला स्वयंसंचालीत बनविण्यासाठी करिधल यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. 

वनिता यांनी इस्रोच्या 'टेलिमेट्री आणि टेलीकमांडीग' विभागात काम केले आहे. त्यांनी इलेक्‍ट्रॉनिक सिस्टिम चे अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. इस्रोच्या रिमोट सेन्सिंग उपग्रहांतून येणाऱ्या माहितीचे संश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. काट्रोसॅट-1, ओशनसॅट-2 मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

 जगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या चंद्र मोहिमेचे नेतृत्व अधिक सक्षमपणे पार पाडण्यास या दोघी सिद्ध आहे. आपल्या कतृत्वाच्या जोरावर आज त्यांनी हा बहुमान आणि इतिहासात नाव कोरण्याची संधी प्राप्त केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leadership of Chandrayaan-2 will handle M vanita and ritu dhariwal