Lenovo चा सर्वात पावरफुल गेमिंग फोन; मिळेल 22GB रॅम, 640GB स्टोरेज

lenovo legion y90
lenovo legion y90

लेनोवो (Lenovo) लवकरच एक सुपर पावरफुल गेमिंग स्मार्टफोन (Gaming Smartphone) बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Lenovo Legion Y90 असून हा स्मार्टफोन 22GB रॅम आणि 640GB इंटरनल स्टोरेजसह येईल. फोनमध्ये उपलब्ध असलेल्या 22GB रॅममध्ये 18GB वास्तविक आणि 4GB व्हर्च्युअल रॅम आहे. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 22GB रॅम मिळणार आहे.

फोनमध्ये उपलब्ध 640GB च्या इंटरनल मेमरीसाठी कंपनीने 512GB आणि 128GB स्टिक एकत्र जोडल्या आहेत. याशिवाय कंपनी या फोनमध्ये 5600mAh ची बॅटरी देखील देणार आहे. लेनोवोच्या या आगामी फोनबद्दल ही महत्त्वाची माहिती Weibo वर Pandayisbald नावाच्या टिपस्टरने दिली आहे.

मिळणार 120Hz रिफ्रेश रेट

कंपनी या फोनमध्ये 6.92-इंचाचा E4 Samsung AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. गेमिंगचा बेस्ट इक्सपिरिएंससाठी, या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 720Hz आहे.

lenovo legion y90
देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार; देतात 31KM पर्यंत मायलेज

44 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा

22 जीबी रॅम आणि 640 जीबी इंटरनल स्टोरेजसह येणाऱ्या या फोनमध्ये कंपनी क्वालकॉमचा पॉवरफुल आणि प्रीमियम चिपसेट म्हणजेच स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर म्हणून ऑफर करणार आहे . फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस, तुम्हाला OmniVision सेन्सरने सुसज्ज 64 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 16 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा दिसेल. त्याच वेळी, सेल्फीसाठी या फोनमध्ये 44-मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाईल.

68W फास्ट चार्जिंग

हा फोन 5600mAh बॅटरीसह येईल, जो 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनच्या लॉन्च तारखेबद्दल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की तो फेब्रुवारीमध्ये बाजारात येऊ शकतो.

lenovo legion y90
२६ जानेवारीला लाँच होणार 'ही' स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक; पाहा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com