LinkedIn Layoff : फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता LinkedIn 700 कर्मचार्‍यांना काढून टाकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LinkedIn Layoff

LinkedIn Layoff : फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता LinkedIn 700 कर्मचार्‍यांना काढून टाकणार

LinkedIn Layoff : 2023 च्या सुरुवातीपासून, दररोज काही मोठी टेक कंपन्या टाळेबंदीची घोषणा करत आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या मालकीचे व्यावसायिक नेटवर्क LinkedIn देखील आता या शर्यतीत सामील झाले आहे.

लवकरच 716 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. इतकेच नाही तर कंपनी आपले चायनीज जॉब अॅप्लिकेशन अॅपही बंद करणार आहे.जागतिक आर्थिक संकट पाहून आधी मायक्रोसॉफ्ट आणि आता लिंक्डइनने कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी केली आहे. लिंक्डइन मध्ये 20,000 कर्मचारी आहेत. गेल्या वर्षभरात म्हणजेच 2022 मध्ये प्रत्येक तिमाहीत कंपनीचा महसूल वाढला होता, आणि तरीही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कंपनीचा निर्णय आश्चर्यकारक आहे.

टाळेबंदीवर नजर ठेवणाऱ्या Layoffs.fyi नुसार, गेल्या सहा महिन्यांत जागतिक स्तरावर 2 लाख 70 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे.लिंक्डइनकडे पैसे मिळवण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक जाहिरात आणि दुसरा सबस्क्रिप्शन. कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात, लिंक्डइनचे सीईओ रायन रोस्लान्स्की म्हणाले की ऑपरेशन्स, सेल्स आणि सपोर्ट टीममध्ये काम करणार्‍या लोकांना कामावरून काढून टाकले जाईल.

आव्हानात्मक वातावरणाचा दाखला देत लिंक्डइनने सांगितले की कंपनी चीनमध्ये चालणारे त्यांचे जॉब अॅप देखील बंद करणार आहे. कंपनी आपले InCareers अॅप 9 ऑगस्टपर्यंत बंद करणार आहे.

या बदलांमुळे कंपनी 250 नवीन नोकर्‍या निर्माण करेल असेही रायन रोस्लान्स्की यांनी सांगितले. लिंक्डइनच्या प्रवक्त्याने असेही सांगितले आहे की टाळेबंदीमुळे प्रभावित झालेले कर्मचारी या नोकरीचा अर्ज करण्यास पात्र असतील.