स्वस्तात मस्त! बहुचर्चित जिओफोन 5G ची फिचर्स लीक; जाणून घ्या किंमत

जिओचा बहुप्रतिक्षित 5G स्मार्टफोन JioPhone 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये इंटरनेटवर समोर आली आहेत.
JioPhone 5G
JioPhone 5GSakal

जिओचा बहुप्रतिक्षित 5G स्मार्टफोन JioPhone 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये इंटरनेटवर समोर आली आहेत. गेल्या वर्षी जिओफोन नेक्स्ट आणल्यानंतर, रिलायन्स जिओ Android आवृत्तीवर आधारित आणि ग्राहकांच्या खिशाला परवडेल असा स्मार्टफोन JioPhone 5G लाँच करण्याची योजना आखत आहे. नवीन JioPhone मॉडेल विविध स्क्रीन आकार आणि वैशिष्ट्यांसह अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. Jio चा नवीन फोन पंच होल डिस्प्ले डिझाइन आणि पातळ बेझल्ससह येईल. भारतात JioPhone 5G ची किंमत खूपच कमी असण्याचा अंदाज आहे. चला जाणून घेऊया JioPhone 5G ची किंमत आणि संभाव्य फिचर्सबाबत: (Many shocking revelations about Jio Phone 5G, price and features leak)

JioPhone 5G
Vivo V23: नववर्षात लाँच होणार iPhone सारखा दिसणारा विवोचा Smartphone

JioPhone 5G ची भारतात अपेक्षित किंमत (Expected Price of JioPhone 5G in India)-

Android Central ने JioPhone 5G बद्दल काही तपशील दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,000 ते 12,000 रुपयांदरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार जिओफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. गतवर्षी जिओफोन नेक्स्टप्रमाणे जिओफोन 5G सुद्धा काही फायनान्सिंग पर्यायांसह उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे त्याची किंमत आणखी स्वस्त होऊ शकते.

JioPhone 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन (Possible Specifications of JioPhone 5G)-

Android सेंट्रलने अहवाल दिला आहे की, JioPhone 5G फोन Android 11 (Go Edition) वर चालेल. मोबाईलमध्ये 6.5-इंच HD+ (720x1,600 pixels) IPS डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये किमान 4GB RAM सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC असल्याचे देखील बोललं जात आहे. फोटो आणि व्हिडिओसाठी JioPhone 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑटोफोकस लेन्ससह 13-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश असेल. JioPhone 5G वर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असू शकतो.

JioPhone 5G
JioPhone नंतर येतोय Jioचा सर्वात स्वस्त JioBook लॅपटॉप

JioPhone 5G मध्ये किमान 32GB ऑनबोर्ड स्टोरेज असल्याची माहिती मिळत आहे आणि microSD कार्डद्वारे ती वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 a/b/g/n, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS/ NavIC, आणि USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, JioPhone 5G मध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असू शकते. याशिवाय, फोन MyJio, JioTV आणि JioSaavn च्या प्रीलोडेड अॅप्ससह येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com