अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल धारकांसाठी गुगलने आणलीय फोटो अन्‌ व्हिडीओ एडिटींग सुविधा

google
google

जळगाव : आतापर्यंत आयओएस (ios) वापरकर्ते वापरत असलेल्‍या गुगलची टेक्‍नॉलॉजी आता काही दिवसातच गुगल अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्‍ध होणार आहे. गुगल अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आता फोटो आणि व्हिडीओ एडिटिंगचा पर्याय मिळणार आहे.

गतवर्षी म्‍हणजे सप्टेंबर 2020 मध्ये गुगलने (फोटो) फोटो एडीटींगचे फिचर्स केवळ गुगल फोटोमध्ये दिले होते. मात्र कॅलिफोर्नियामधील माऊंटनव्ह्यू येथे असलेल्या आता गुगलने कंपनीने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी व्हिडीओ एडिटिंगची सुविधा दिली आहे. त्यानंतर अ‍ॅपच्या माध्यमातून आता व्हिडीओमध्ये अधिक एडिटिंग करता येणार आहे. आतापर्यंत गुगल प्लॅटफॉर्ममधील ही वैशिष्ट्ये आयओएस वापरकर्त्यांसाठी होती. नवीन व्हिडिओ एडिटींगचे फिचर्स वापरण्यासाठी गुगल फोटो ॲपला अपडेट करावे लागणार आहे.

30 पेक्षा जास्त कॉन्ट्रास्‍ट
नवीन अद्ययावत फिचर्सस आपल्या फोनवर या अ‍ॅपद्वारे व्हिडिओ एडिटींगसाठी 30 पेक्षा अधिक कंटोल वापरता येणार आहे. यामध्ये आपण व्हिडिओसह क्रॉप करणे देखील सोपे होणार आहे. तसेच फिल्टरच्या सहाय्याने व्हिडिओचे स्थिरीकरण देखील उपलब्ध असेल. इतकेच नाही तर व्हिडिओची तीव्रता, कॉन्ट्रास्ट करता येईल; जे आतापर्यंत फोटोत करता येत होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे अ‍ॅप वापरल्यानंतर ते व्हिडिओ संपादन अगदी सहज करू शकतील.

पिक्सेल स्मार्टफोनची वैशिष्ट्ये देखील
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गुगल टॅब्लेटवर जाणारी प्रीमियम फायटा एडिटिंग वैशिष्ट्ये अद्याप पिक्सेल स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पोर्टेबल ब्लू, पोर्टेबल लाइट, कलर पॉप समाविष्ट आहे. गुगल वनचा वापर करणाऱ्यांना अन्य ॲन्ड्राईड डिव्हाइसवर उपलब्ध असतील.

गुगल वन वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्य
गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, की येत्या काही दिवसांत गुगल वनचे ग्राहक सुपर फिल्टर वापरू शकतील. त्यानंतर त्यांचे फोटो केवळ एका क्लिकवर एडिट होवू शकतील. यासह सूर्योदय आकाशातील वेगवेगळ्या मोडद्वारे त्यांच्या गेल्डनअवर फोटोचा रंग आणि कॉन्ट्रास्ट बदलण्यात सक्षम होईल. हे वैशिष्ट्य लवकरच येत आहे. हे फीचर वापरण्यासाठी किमान ३ जीबी जीबी रॅम आणि अँड्रॉईड किंवा त्यापेक्षा जास्त वापरणे आवश्यक असल्याचे गुगलचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com