'या' तीन कारणांसाठी जिओ फोन हाती हवा...!

शनिवार, 23 सप्टेंबर 2017

ऑगस्टमध्ये लाँच केलेल्या जिओच्या फिचर फोनची डिलीवरी आता सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 60 लाख हँडसेटची बुकींग झाली आहे. 

ऑगस्टमध्ये लाँच केलेल्या जिओच्या फिचर फोनची डिलीवरी आता सुरु करण्यात आली आहे. अवघ्या दीड हजार रुपयांत हा फोन मिळणार आहे. आतापर्यंत जवळपास 60 लाख हँडसेटची बुकींग झाली आहे. लवकरच या ग्राहकांच्या हातात फोन मिळणार आहे. 

'ई सकाळ' च्या फेसबुक लाईव्ह मध्ये हा फोन नेमका कसा आहे आणि त्यामध्ये नेमके काय फिचर्स आहेत हे दाखविण्यात आले.

सिंगल सिम असलेल्या या फोन सोबत जिओचे नवीन सिम मिळणार आहेत. या सिमवर 153 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 1 महिन्यासाठी अमर्याद कॉलिंग आणि 4G डेटा मिळणार आहे. 

याशिवाय या तीन कारणांसाठी जिओ फोन वापरता येऊ शकेल :

1. व्हाट्सअॅप,फेसबुकही वापरता येणार
जिओच्या फिचर फोनमध्ये 'व्हॉट्सअप' चालणार की नाही याबाबत शंका होती. या फोनमध्ये सध्या व्हाट्सअॅप नसले तरी ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या अपडेटनंतर व्हाट्सअप डाउनलोड करता येणार असल्याचे जिओतर्फे सांगण्यात आले आहे. या फोनमध्ये सध्या फेसबुक लाइट अॅप वापरता येणार आहे.

2. जिओ स्पीक नवीन फिचर  
आयफोन मधील 'सिरी' प्रमाणे काम करणारे 'जिओ स्पीक' नावाचे हे फिचर या फोन मध्ये देण्यात आले आहे. किपॅडचा वापर न करता आवाजाद्वारे एखादे अॅप ओपन करणे, मेसेज पाठवणे, कॉल करणे इ. गोष्टी करता येणार आहे.

3. टीव्हीला जोडता येणार
जिओचा हा  फोन टीव्हीला जोडून सेट टॉप बॉक्ससारखा वापरता येणार आहे. जिओतर्फे लवकरच यासाठी आवश्यक असणारी केबल बाजारात आणली जाणार आहे. त्यामुळे हा फोन टीव्हीला कनेक्ट करुन जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अॅपद्वारे वेगवेगळे चॅनल, सिनेमे टिव्हीवर पाहता येणार आहे. 

असा आहे फोन...

  • 512MB रॅम
  • 4GB इंटरनल स्टोरेज
  • 2 मेगापिक्सल रिअर आणि VGA फ्रंट कॅमेरा
  • 2000 mAh क्षमतेची बॅटरी
Web Title: Marathi news jio phone jio booking jio first impressions