आता व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पैसे करा 'ट्रान्सफर'

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

'युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस'च्या (यूपीआय) माध्यमातून व्हॉटस्अप पेमेंटची सुविधा भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक या बँकांच्या मदतीने उपलब्ध करण्याचा सध्या विचार आहे. 

नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅप यांसारख्या सोशल मीडियावर संभाषण केले जाते. त्यानंतर आता व्हॉटस्अॅप या सोशल मीडियावर लवकरच 'डिजिटल पेमेंट'ची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून अॅप्लिकेशनही लाँच करण्यात आले होते. याशिवाय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलती दिल्या जात आहेत. प्रसिद्ध अशा व्हॉटस्अॅपवर संभाषण, व्हिडिओ कॉलिंग केले जात आहे. त्यानंतर आता व्हॉटस्अॅपवर डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉटस्अॅपकडून सध्या यावर विचार केला जात आहे. या नव्या फिचर्सच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवणे सहज शक्य होणार आहे. व्हॉटस्अॅपकडून हे नवे फिचर्स येत्या फेब्रुवारीपर्यंत आणण्याचा विचार आहे.  

'युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस'च्या (यूपीआय) माध्यमातून व्हॉटस्अप पेमेंटची सुविधा भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक या बँकांच्या मदतीने उपलब्ध करण्याचा सध्या विचार आहे. 

Web Title: Marathi news make payment through WhatsApp featured will launch early