फोन, कंप्युटरवर हिंदी टायपिंग करा दोन क्लिकमध्ये, ही आहे सोपी पध्दत

टीम ईसकाळ
Sunday, 21 February 2021

बऱ्याच जणाना माहिती नसते की हिंदी किंवा मराठी टायपिंग करण्यासाठी लागणारा 'किबोर्ड' तुमच्या फोन, कंप्युटरमध्ये इनबिल्ट दिलेला असतो. फक्त तो किबोर्ड तुम्हाला फोन आणि कंप्युटरच्या सेटिंग्समध्ये जाऊन ऑन करण्याची गरज असते. आज आपण त्याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत. 

फोन आणि कंप्युटरवर हिंदी किंवा मराठीत टाइप करण्यासाठी ऑनलाईन असंख्या एप्लिकेशन आणि सॉफ्टवेयर आहेत, बरेचजण हिंदी टायपिंगसाठी मोठ-मोठे अॅप डाऊनलोड करतात. असे अॅप तुमच्या फोनची इंटरनल मेमरी फुल करतात. पण बऱ्याच जणाना माहिती नसते की हिंदी किंवा मराठी टाइप करण्यासाठी लागणारा 'किबोर्ड' तुमच्या फोन, कंप्युटरमध्ये इनबिल्ट दिलेला असतो. फक्त तो किबोर्ड तुम्हाला फोन आणि कंप्युटरच्या सेटिंग्समध्ये जाऊन ऑन करण्याची गरज असते. आज आपण त्याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत. 

स्मार्टफोन कसा शोधाल हिंदी कीबोर्ड?

गुगलच्या अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम वर चालणाऱ्या जवळपास सर्वच पोनमध्ये गुगल कीबोर्ड इंस्टॉल केलेला असतो आणि त्यामध्येच हिंदी तसेच मराठी किबोर्ड देखील इनबिल्ट असतो. त्यामध्यो जगभरातील अनेक भाषा देखील देण्यात आलेल्या असतात. असे असताना देखील वापरकर्ते त्यांच्या फोनमध्ये इतर एप्लिकेशन्स डाऊनलोड करतात. 

कीबोर्ड एक्टिवेट कसा कराल?

सर्वप्रथम ज्या फोनमध्ये हिंदी किंवा मराठीत टाइप करायचे आहे त्यामध्यो मॅसेज उघडा. त्यामध्ये दिलेल्या किबोर्डवर कोपऱ्यात ग्लोबचे चिन्ह देण्यात आलेले असते, त्या ग्लोबवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हिंदीसह जगभरातील इतर अनेक भाषांचे पर्याय ओपन होतील. त्यामध्ये हिंदी किंवा मराठी निवडा. त्यांनंतर तुम्ही हिंदी किंवा मराठीत टाईप करु शकता.  भाषा पुन्हा बदलण्यासाठी परत तीच पध्दत वापरा. 

जर ग्लोबच चिन्ह नसेल तर काय?

जीबोर्ड (GoogleBoard)  बदल्याण्यासाठी जर कीबोर्डवर ग्लोबचे चिन्ह येत नसेल तर तुमच्या फोनची सेटिंग उघडा. त्यामध्ये 'लँग्वेज अँड इनपुट' (Language and Input method) हा पर्याय क्लिक करा. त्यानंतर त्याखाली दिलेला डिफॉल्ट किंवा तुम्ही वापरत असलेले एप्लिकेशनचे नाव येईल. पण त्या जागी तुम्हाला गुगल कीबोर्ड हवा आहे. त्यामुळे डिफॉल्टच्या खाली गुगल कीबोर्ड दिलेला असेल, त्याच्या डाव्या बाजूला क्लिक केल्यानंतर आणखी नवा डिस्प्ले उघडेल, ज्यावर 'गुगल कीबोर्ड सेटिंग्स' लिहिलेले असेल. त्यानंतर त्यात लँग्वेज बॉक्सला क्लिक केल्यानंतर आणखी एक नवा ऑप्शन बॉक्स उघडेल, त्यामघ्ये पहिला ऑप्शन सलेक्ट केलेला दिसेल तो तुम्हाला काढून टाकावा लागेल.  त्यावर दिलेला मार्क काढल्यानंतर तुम्हाला जगभरातील भाषेचे पर्याय दिसायला लागतील. त्यापैकी हिंदी कीबोर्ड सुरु करण्यासाठी दिलेल्या ऑप्शन्समधून हिंदी सिलेक्ट करा. सोबतच इंग्रजी(भारत) हा पर्याय देखील सेलेक्ट केलेला राहू द्या. जेणेकरुन तुम्हाला दोन्ही भाषा एकत्र वापरता येतील. यानंतर फोनमध्ये तुम्ही  हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये टाइप करु शकाल. 

विंडोज ७ (Windos 7)  मध्ये हिंदी टाइप 

विंडोजमध्ये हिंदी टाइप करण्यासाठी सर्वात आधी कंप्यूटरच्या 'कंप्यूटर पॅनल' उघडा, त्यासाठी स्टार्ट बटन वर क्लिक करा व उघडलेल्या मेन्यूबार मध्ये कंप्यूटर पॅनलचा ऑप्शन सापडेल. तो उघडल्यानंत तुम्हाला Region and Language हा पर्याय निवडावा लागेल. त्यामध्ये  दिलेल्या चार ऑप्शन्स पैकी चार क्रमांकाचा ऑप्शन 'लँग्वेज अँड एडमिनस्ट्रेटिव' हा पर्याय निवडा.  त्यामध्ये परत तीसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन कीबोर्ड यावर क्लिक करा. पुढची स्टेप हिंदी (इंडीया) हा विकल्प उघडा त्यामध्ये देवनागरी-इनक्रिप्ट आणि हिंदी ट्रेडिशनल या दोन्ही पैकी कुठलाही एक पर्याय निवडा आणि एप्लाय वर क्लिक करा. या नंतर तुम्ही तुमच्या कंप्यूटर वर देखील आरामात हिंदी टाइप करु शकता. 

कीबोर्ड हिंदी-इंग्रजी बदलणे

हे अगदी सोपे आहे. हे ऑप्शन इनबिल्ट देण्यात आलेले आहे, तुम्हाला फक्त Shift+Alt बटन प्रेस करावे लागतील. समजा तुम्ही हिंदीमध्ये टाइप करताय तर Shift+Alt प्रेस करुन तुम्ही कीबोर्ड इंग्रजीमध्ये बदलू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi story about know how to use Hindi typing keyboard on phone and computer