Maruti Baleno : मारा मौके पे चौका! चक्क 4 लाख रुपयांत मिळतीय मारुती बलेनो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Baleno

Maruti Baleno : मारा मौके पे चौका! चक्क 4 लाख रुपयांत मिळतीय मारुती बलेनो

Maruti Baleno Car Price : मारुती बलेनो ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक कार आहे. त्याची फेसलिफ्ट आवृत्ती गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती. फेसलिफ्टेड आवृत्ती लाँच झाल्यापासून तिची भन्नाट वेगाने विक्री होत आहे.

ही अनेक वेगवेगळ्या महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारी कार देखील आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याची विक्री वाढली आहे. तथापि, त्याचे जुने मॉडेल देखील चांगले विकले जायचे.

त्यामुळे या जुन्या मॉडेलची देखील मागणी खूप आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मारुती बलेनोचे जुने मॉडेल घ्यायचे असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही जुन्या मारुती बलेनो कारची माहिती घेऊन आलो आहोत, ज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कार मारुती सुझुकीच्या अधिकृत ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मारुती बलेनो 1.3 ZETA ची किंमत 4.25 लाख रुपये आहे. हे मुरादाबादमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. डिझेल इंजिनच्या या बलेनो कारने एकूण 123596 किमी रनिंग केले आहे. ही सेकंड हँड कार आहे आणि 2015 मॉडेलची आहे.

मारुती बलेनो 1.2 SIGMA साठी 4.35 लाख रुपये किंमतीची डिमांड येथे दाखवली आहे. ही कार कोलकातामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिनच्या या बलेनो कारने एकूण 23859 किमी धावले आहे. ही पहिली मालकीची कार आहे आणि 2018 मॉडेलची आहे.

येथे लिस्टेड असलेल्या मारुती बलेनोला 1.3 DELTA 4.65 लाख रुपयाची डिमांड आली आहे. हे रेवाडी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही पेट्रोल इंजिन बलेनो कार 199085 किमी धावली आहे. ही देखील पहिली मालकीची कार आहे आणि 2018 मॉडेलची आहे.

येथे लिस्टेड असलेली आणखी एक मारुती बलेनो 1.3 ZETA हिला 4.75 लाख रुपयेची डिमांड अली आहे. ती कार बोकारोमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे डिझेल इंजिनद्वारे चालते आणि एकूण 75723 किमी अंतर कापले आहे. ही पहिली मालकीची कार आहे आणि 2016 मॉडेलची आहे.