Maruti पुन्हा बनली नंबर 1; Hyundaiला मोठा झटका, टाटाची भरारी

मे महिन्यात मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स या कार निर्मात्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
Maruti Suzuki
Maruti SuzukiSakal

यंदा मे महिन्यात मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स या कार निर्मात्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरची कमतरता असूनही, अनेक विभागांमध्ये वाहनांना मागणी असल्याने कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, किया इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा यांच्या वाहनांच्या विक्रीतही वाढ नोंदवली गेली आहे.

टाटाने ह्युंदाईला टाकले मागे-

मे 2022 मध्ये भारतात वाहन विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्सची विक्री Hyundai पेक्षा जास्त होती. त्याचवेळी, देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची (MSI) विक्री मे महिन्यात 134222 वाहनांवर पोहोचली आहे. भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे मे 2021 मध्ये कंपनी फक्त 35,293 वाहने विकू शकली होती. कंपनीने सांगितले की, या वर्षी मे महिन्यात, स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर सारख्या मॉडेलसह कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये 67,947 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी या वेळी ती 20,343 होती.

Maruti Suzuki
महिंद्रा 'या' दिवशी लाँच करणार इलेक्ट्रिक XUV300; Tata Nexon EV ला देणार तगडी टक्कर

यामुळे ह्युंदाई राहिली मागे-

भारतीय बाजारपेठेत कार विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स दुसऱ्या स्थानावर आहे. मे महिन्यात कंपनीची विक्री वाढून 43,341 झाली. एका महिन्यात कंपनीची आतापर्यंतची ही सर्वाधिक विक्री आहे. चेन्नईतील कंपनीच्या दोन्ही प्लांटमधील देखभालीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे ह्युंदाई मोटरने म्हटले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात 16 ते 21 मे या सहा दिवसांत एकाही कारचे उत्पादन झाले नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे मे महिन्यात वाहनांचा तुटवडा निर्माण झाला, ज्याचा विक्रीच्या आकडेवारीवर (देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही) परिणाम झाला.

महिंद्रासाठीही मे महिना चांगला

महिंद्र अँड महिंद्राने (M&M) मे महिन्यात भारतीय बाजारपेठेत 26,904 वाहनांची विक्री केली. महिंद्रा अँड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “आम्ही मे महिन्यात २६,६३२ एसयूव्ही विकल्या आहेत. XUV700 आणि थार सह आमच्या सर्व ब्रँड्सनी चांगली कामगिरी केली आहे.”

Maruti Suzuki
Tata लॉंच करणार 'या' 4 इलेक्ट्रिक कार; काय असेल खास? वाचा

किआ आणि टोयोटाच्या विक्रीतही वाढ झाली आहे

किआ इंडियाची विक्री मे महिन्यात वार्षिक 69 टक्क्यांनी वाढून 18,718 वाहने झाली. मे 2021 मध्ये, कंपनी कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेत केवळ 11,050 वाहने विकू शकली. त्याचप्रमाणे टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या (टीकेएम) विक्रीतही वाढ झाली आहे. कंपनीने मे महिन्यात 10,216 वाहनांची विक्री केली. कंपनीने गेल्या वर्षी मे महिन्यात केवळ 707 वाहनांची विक्री केली होती.

होंडा, स्कोडा, एमजी-

Honda Cars India ची देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात वर्षभरात वाढून 8,188 वाहने झाली जी मे 2021 मध्ये 2,032 होती. याशिवाय मे महिन्यात स्कोडा इंडियाने 4,604 आणि MG मोटर इंडियाने 4,008 वाहनांची विक्री केली.

बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर-

दुचाकी विभागात, मे महिन्यात बजाज ऑटोची भारतातील विक्री 1,12,308 पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 60,830 दुचाकींची विक्री केली होती. TVS मोटर कंपनीची दुचाकी विक्री देखील गेल्या महिन्यात मे २०२१ मध्ये ५२,०८४ वरून १,९१,४८२ पर्यंत वाढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com