दमदार मायलेजची मारुतीची नवी कार; जाणून घ्या फिचर्स

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली लोकप्रिय कार बलेनो (Baleno) अपडेटेड मॉडेलमध्ये लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.
Maruti Suzuki Baleno Booking News Updates
Maruti Suzuki Baleno Booking News Updatesesakal

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली लोकप्रिय कार (Car) बलेनो (Baleno) अपडेटेड मॉडेलमध्ये लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हे अपडेटेड मॉडेल 23 फेब्रुवारी रोजी लॉन्च केले जाऊ शकते. जास्त मायलेज ही या हॅचबॅकची खासियत असून ते पूर्वीच्या तुलनेत वाढेल. यासह कंपनी मारुती सुझुकी बलेनोला अनेक नवीन आधुनिक फिचर्ससह बाजारात आणू शकते.

फिचर्स (Features)-

फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 मारुती सुझुकी बलेनोला 9-इंच डिजिटल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 व्ह्यू कॅमेरा, एक हेड अप डिस्प्ले (HUD) स्क्रीन, ARKAMYS ऑडिओ सिस्टम, नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळू शकेल. अद्ययावत स्टीयरिंग व्हील आणि क्लायमेट कंट्रोलसाठी नवीन स्विच समाविष्ट केले जाऊ शकतात. लीक झालेल्या तपशीलांनुसार, गाडीच्या आतील बाजूस फ्रेश लुक देण्यासाठी अपहोल्स्ट्री देखील बदलण्यात आली आहे. यासोबत अपडेटेड बलेनोमध्ये इतर फिचर्स पाहता येतील. मात्र ते लॉन्च झाल्यानंतरच अधिकृतपणे समोर येईल. तोपर्यंत ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Maruti Suzuki Baleno Booking News Updates
कार निर्यातीत मारूती सुझुकी झाली नं.1

इंजिन (Engine)-

2022 मारुती सुझुकी बलेनो कारमध्ये 1.2-लीटर ड्युअलजेट K12N पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 90hp पॉवरसह 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सशी जोडले जाईल. मायलेज वाढवण्यासाठी हे इंजिन ऑटो इंजिन स्टार्ट/स्टॉप वैशिष्ट्यासह येईल. तथापि, हे सध्याच्या बलेनो सारख्या 12V सौम्य-हायब्रिड तंत्रज्ञानासह येणार नाही.

मायलेज (Mileage)-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन Baleno मॅन्युअल वेरिएंट 22.35kmpl मायलेज देऊ शकते, तर AMT व्हेरिएंटचे मायलेज सुमारे 22.94kpl असल्याचा दावा केला जात आहे.

Maruti Suzuki Baleno Booking News Updates
मारुती सुझुकी 'ही' कार आणतेय इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये

कुणाशी असेल स्पर्धा? (Competition)-

अद्ययावत Baleno लाँच केल्यानंतर, तिची स्पर्धा भारतीय बाजारपेठेतील Tata Altroz, Hyundai i20 आणि Honda Jazz सारख्या हॅचबॅक वाहनांशी स्पर्धा करेल.

किंमत (Price)-

या वाहनाच्या लाँचिंगवेळी किंमत जाहीर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com