Maruti Suzuki कारच्या किंमतीत बदल; काय आहे नवी Price List जाणून घ्या

मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत.
Maruti Suzuki Swift
Maruti Suzuki Swift Sakal

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही देशातील अग्रगण्य कंपनी आहे. मारूती सुझुकीच्या कारची देशात सर्वाधिक विक्री होते. जर तुम्ही होळीपूर्वी नवीन मारुती सुझुकी कार घेण्याचा विचार करत असाल तर आमची ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. मारुती सुझुकी आपल्या कारची विक्री Arena आणि Nexa डिलरशिपद्वारे करते. Nexa ही कंपनीची प्रीमियम डीलरशिप चेन आहे जी मारुती बलेनो, सियाझ, इग्निस आणि XL6 सारखी वाहने विकते. तर Alto, Ertiga, WagonR, Eeco, Celerio आणि WagonR सारखी वाहने Arena डीलरशिपद्वारे विकली जातात.

Maruti Suzuki Swift
मारुती सुझुकीची नवीन CNG कार; मिळेल जबरदस्त मायलेज

मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत, त्यामुळे सर्व गाड्यांच्या किमती पूर्वीच्या तुलनेत वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी अरेनाच्या सर्व वाहनांच्या किमतींबद्दल सांगणार आहोत.

मारुती सुझुकीची कोणतं मॉडेल किती सुरु होतं आणि त्याच्या टॉप मॉडेलची किंमत काय हे आपण जाणून घेणार आहोत. (सर्व किंमती- दिल्ली एक्स शोरूम)

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) 3.25 लाख रु.- 4.95 लाख रु.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) 5.18 लाख रु. -6.58 लाख रु.

मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) 3.86 लाखांपासून सुरु

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) 5.15 लाख रु. -6.94 लाख रु.

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) 5.90 लाख रु. -8.63 लाख रु.

मारुती सुझुकी सुपर कॅरीने पार केला १ लाखाचा टप्पा

मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga 8.13 लाख रु. -10.86 लाख

मारुती सुझुकी ईको (Maruti Suzuki Eeco) 4.53 लाख रु. -7.52 लाख

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire) 6.09 लाख रु. -9.13 लाख

मारुती सुझुकी स्विफ्ट व्यतिरिक्त भारतीय बाजारात या सर्व वाहनांचे CNG मॉडेल देखील विकते. मारुती अल्टो (Maruti Alto) ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. त्याच वेळी, मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) गेल्या 90 दिवसांपासून देशात सर्वाधिक विक्री होणारी कार राहिली आहे. तर, Ertiga देशातील सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com