
MG Comet EV : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणखीनच होणार स्वस्त, जाणून घ्या सविस्तर
MG Comet EV : ब्रिटिश कार कंपनी एमजीकडून भारतीय बाजारात एप्रिल महिन्याच्या अखेरमध्ये दुसरी इलेक्ट्रिक कार कॉमेटला आणले होते. लाँचिंग वेळी कंपनीने याचे फक्त एकाच व्हेरियंटची माहिती दिली होती. परंतु, आता याच्या अन्य व्हेरियंट्सची घोषणा केली आहे. कॉमेट ईव्हीच्या सर्व व्हेरियंट्स आणि त्याच्या किंमतीची माहिती देत आहोत.
एमजीने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीच्या सर्व व्हेरियंट्सची घोषणा केली आहे. कंपनीकडून पहिले याचे एक व्हेरियंट आणले गेले होते. परंतु, आता कॉमेटसाठी एकूण तीन व्हेरियंट्स उपलब्ध होतील. ज्यात पेस, प्ले आणि प्लशचा समावेश आहे.
लाँचिंग वेळी कंपनीने सुरुवातीच्या व्हेरियंटला ७.९८ लाख रुपयाच्या एक्स शोरूम किंमतीत आणले होते. परंतु, आता याची किंमत ९.९८ लाख रुपये पर्यंत असणार आहे. तर याचे मिड व्हेरियंट ९.२८ लाख रुपये किंमतीत मिळेल.
बायबॅकची ऑफर
कंपनीकडून कॉमेट ईव्हीवर बायबॅकची ऑफर सुद्धा दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बायबॅक ऑप्शन खरेदी केल्यास कंपनी तीन वर्षानंतर ६० टक्के किंमत परत करणार आहे. ही किंमत कारची एक्स शोरूम किंमतवर परत मिळणार आहे.
फीचर्स
एमजीची नवीन कॉमेट इलेक्ट्रिक कार मध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. कारचे एक्सटीरियर मध्ये कनेक्टेड एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाइट्स दिली आहे. यासोबत इंटिरियर मध्ये अॅपल आयपॉड मधून स्टेयरिंग बट्स, १०.२५ इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर, १०.२५ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम, स्पीकर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ड्युअल कलर्ड इंटिरियर, अॅप्पल कार प्ले, अँड्रॉयड ऑटो मिळते.
सुरक्षा
कारमध्ये सुरक्षेचे खास ध्यान ठेवले गेले आहे. यात एअरबॅग, टीपीएमएस, एबीएस, ईबीडी सारखे फीचर्स दिले आहेत. यासोबत रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, थ्री पॉइंट सीटबेल्ट सुद्धा दिले आहे.
कॉमेट देशातील सर्वात छोटी कार आहे. याची एकूण लांबी २९७४ एमएम आहे. याची रुंदी १५०५ एमएम, उंची १६४० एमएम आहे. कारचे व्हीलबेस २०१० एमएम आहे. तसेच याचे टर्निंग रेडियस ४.२ मीटर आहे. कंपनीकडून कारमध्ये १७.३ Kwh ची मोटर दिली आहे. याला चार्ज करण्यात जवळपास ७ तास लागतील. कंपनीच्या माहितीनुसार, याला फुल चार्ज केल्यानंतर २३० किमीची रेंज मिळते.