Mi10 Pro ठरलाय 'बेस्ट सेलर'; अवघ्या 55 सेकंदांत...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

- 20 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) ने आपले दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. Mi10 आणि Mi10 Pro हे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन लाँच झाल्यानंतर लगेचच याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शाओमीचे हे दोन स्मार्टफोन इतके लोकप्रिय आहेत की या फोनचा पहिला सेल फक्त 55 सेकंदांत संपला. यामध्ये विक्री झालेल्या स्मार्टफोनची किंमत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे कंपनीने सांगितले. पण आता खरेदी करण्यासाठी आलेल्या युजर्सना हे दोन्ही फोन 'आऊट ऑफ स्टॉक' दिसू लागले आहेत.

CoronaVirus : स्त्री की पुरुष कोणाला आहे कोराना व्हायरसचा अधिक धोका?

शाओमी M10 या स्मार्टफोनचा पहिला सेल 14 फेब्रुवारीला सुरु झाला होता. Mi10 चा सेल 60 सेकंदांत संपला होता. त्या सेलमध्येही 200 कोटींचे मोबाईल विकले गेले होते. तर Mi10 Pro ने अवघ्या 55 सेकंदांत 200 कोटी रुपयांचा सेल केला. 

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स

- डिस्प्ले : 6.47 इंचाची फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले

- 20 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर

- 12 एमपीचा डेप्थ सेन्सर

- 5 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स

- 2 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स असे पाच कॅमेरे.

- 32 मेगापिक्सलचा कॅमेरा. 

Image result for mi 10 pro

- प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 जी.

- बॅटरी : 5260 एमएएचची फ्लॅश चार्ज बॅटरी. 

- शाओमी Mi10 Pro हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध. सिल्व्हर ब्लॅक, पीच गोल्ड आणि आईस ब्ल्यूमध्ये येतो. 

- स्टोरेज : 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज 

- किंमत : 50,000 रुपये

- 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज 

- 55,000 रुपये

- 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज

- किंमत : 60,000 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mi10 Pro Smartphone Launch