ही ऍप तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहेत का?

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

हेडस्पेस 
ध्यान आणि त्याच्या अंमलबजावणीचे तंत्र शिकण्यासाठी हे ऍप आहे. या ऍपच्या मदतीने तुम्ही तुमच्या मेंदूला शांत, आनंदी आणि निरोगी ठेवू शकता. धकाधकीच्या जीवनात ताणतणाव कमी करण्यासाठी रोज 10 मिनिटांत करायचे ध्यान आणि उपयुक्त, असे आणखी बरेच उपाय या ऍपमध्ये देण्यात आले आहेत. ध्यानाची आठवण करून देणे, तुमच्या ध्यानाचे तपशील ठेवणे आदी कामेही हे ऍप करते. यामध्ये दोन मिनिटांपासून ते 60 मिनिटांपर्यंतच्या ध्यानधारणेची माहिती देण्यात आली आहे. 

सिस्टिम पॅनेल 2 
आपल्या स्मार्ट फोनच्या सिस्टिमचा संपूर्ण लेखाजोखा मांडणारी यंत्रणा म्हणजेच सिस्टिम पॅनेल 2 हे ऍप आहे. तुमच्या मोबाईलचे संपूर्ण काम तसेच अंतर्गत कार्येही या ऍपद्वारे तुम्हाला पाहता येतील, कोणते ऍप किती डेटा वापरत आहे किंवा कोणते ऍप सध्या रनिंग आहे आदी सर्व माहिती तुम्हाला या ऍपद्वारे मिळू शकते. ही माहिती देणारी यंत्रणा आपल्या फोनमध्ये इनबिल्ट असली तरी काही खास फीचर्स आणि ग्राफिक्‍सच्या माध्यमातून माहिती देणारे हे ऍप असल्याने याचा वापरही उपयोगी ठरू शकतो. 

स्टिंगिफाय 
भौतिक आणि डिजिटल गोष्टी एकत्र जोडण्याचे काम हे ऍप करते. तुम्हाला स्वत:ची, कुटुंबाची, घराची आणि ऑफिसची चांगली काळजी घेण्यासाठीही हे ऍप मदत करते. ऑफिसमधून बाहेर पडताना लाईट बंद करणे किंवा झोपताना मुख्य दार आपोआप बंद करणे आदी गोष्टी एकदा ऍपमध्ये फीड केल्यानंतर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज पडत नाही; तसेच तुम्ही फिजिकली फिट राहण्यासाठी व्यायामाची आठवण करण्याचे कामही हे ऍप करते.  

स्क्रीन्स- मल्टी विंडो मॅनेजर 
मोबाईल वापरताना एकाचवेळी अनेक कामे करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. एखादा चित्रपट पाहत असताना तुम्हाला आलेल्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे ऍप तुम्हाला उपयोगी ठरू शकते. या ऍपमुळे तुम्ही निवडलेले ऍप तुम्हाला स्प्लिट स्क्रीनमध्ये अर्थात दोन स्क्रीनमध्ये कन्व्हर्ट करता येत असल्याने तुमचा वेळ वाचतो व तुम्ही मल्टी टास्किंगही होता. 

टेड
टेड हे ऍप म्हणजे व्हिडिओ लायब्ररी आहे. याद्वारे तुम्ही तंत्रज्ञान आणि विज्ञान आणि अन्य विषयांचीही माहिती घेऊ शकता. तुम्हाला एखादा विषय समजून घेण्यासाठी ही व्हिडिओ लायब्ररी अत्यंत उपयुक्त असून यामधील व्हिडिओला 100 भाषांत सबटायटल्स (उपशिर्षक) उपलब्ध असल्याने कुणालाही ते सहज वापरता येऊ शकते. व्हिडिओ डाऊनलोड केल्यानंतर ते तुम्ही ऑफलाइनही पाहू शकता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile application