ही ऍप तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहेत का?

This mobile application
This mobile application

सिंपली पियानो 
तुम्हाला पियानो शिकायचा असेल तर हे ऍप तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. शिकाऊंपासून ते पियानो वाजविता येणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ऍप आहे. तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या पियानो कीजवर तुम्ही एका हाताने व दोन्ही हातानेही पियानो वाजवू शकता किंवा वाजविण्याचा सराव करू शकता. संगीताची आवड असलेल्यांसाठी यामध्ये विविध पर्याय उपलब्ध असून तुम्ही मोबाईलवरून एखादी ट्यूनही यामध्ये तयार करू शकता. 

वॉटपॅड 
तुमच्या आवडीच्या कथा आणि पुस्तके तुम्हाला सोबत घेऊन फिरण्यासाठी हे ऍप आहे. या ऍपमध्ये तुम्ही आवडलेल्या कथा आणि पुस्तके सेव्ह करून ती नंतर ऑफलाइनही वाचू शकता. वैज्ञानिक, गूढ, विनोदी, साहसी आदींसोबत प्रेम कथाही तुम्हाला येथे वाचायला मिळतील. त्याचप्रमाणे तुम्ही लेखक असाल तर तुमच्या कथाही तुम्ही येथे इतरांशी शेअर करू शकता. 

अनऍकॅडमी लर्निंग ऍप 
ऑनलाइन शिक्षणासाठी असलेल्या या ऍपवर तुम्हाला यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस/एसबीआय, गेट, सीए, जेईई अशा आणि अन्य महत्त्वाच्या परीक्षांसंबंधी अभ्यास करता येतो. या ऍपवर विविध विषयांचे व्हिडिओ उपलब्ध असून, इंग्रजी भाषेसाठीही खास अभ्यासक्रम उपलब्ध केलेला आहे. वर्गात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा जागतिक दर्जाचे शिक्षण व संधी मुलांना मिळवून देता याव्यात, हे या ऍपचे उद्दिष्ट आहे. 

पोश्‍चर-बी माइंडफुल 
आपण दिवसातून 85 वेळा मोबाईल फोन पाहतो, असे विज्ञान सांगते; परंतु यातील किती वेळा आपण फोन आणि आपली मानेची स्थिती योग्य आहे का याचा विचार करतो? वैज्ञानिक पाहणीनुसार चुकीच्या पद्धतीने फोन धरल्याने मानेवर सुमारे 27 किलो वजन पडते. यामुळे होणारी हानी टाळण्यासाठीच "पोश्‍चर' हे ऍप तुम्हाला मदत करते. या ऍपवर तुम्हाला काही ठराविक मिनिटांनी तुमची फोन धरण्याची स्थिती याबाबत आठवण करून दिली जाते. यामुळे तुम्हाला फोन डोळ्यासमोर व योग्य पद्धतीने धरण्याची सवय तर लागतेच; पण तुमची मानही सलामत राहू शकते. 

मूडकास्ट डायरी 
तुमच्या मूडची तपशिलवार नोंद ठेवण्यासाठी तुम्ही हे ऍप वापरू शकता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही केलेली सकारात्मक कामे किंवा एखाद्यावेळी आलेला कंटाळा या सगळ्याची माहिती भरून तुम्ही तुमच्या मन:स्थितीचा आराखडा तयार करू शकता. महिन्याच्या शेवटी तुम्ही या महिन्यात किती टक्के सकारात्मक होता हे ऍपवर दिसते. याद्वारे सकारात्मक राहण्यास प्रोत्साहन मिळत असून त्याचा आयुष्यात चांगला परिणामही होऊ शकतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com