Mobile Phone Use : मित्रांनो तुम्हीही एवढ्या मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल बघता? जडतील गंभीर आजार l mobile phone use disadvantages continue use of mobile phone can cause this disease to human | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Phone Use

Mobile Phone Use : मित्रांनो तुम्हीही एवढ्या मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल बघता? जडतील गंभीर आजार

Mobile Phone Use : स्मार्टफोन ही हल्ली काळाची गरज झाली आहे. अगदी एका कुटुंबात ४ सदस्य असतील तर एका घरी तुम्हाला ४ मोबाईल फोन दिसून येतील. मात्र तुम्हाला माहितीये मोबाईल फोन सतत बघितल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम पडतो? मोबाइल फोन बघण्याचीही मर्यादा असावी. अधिक काळ मोबाइल बघितल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतील ते जाणून घेऊया.

मोबाइल फोनच्या वापराबाबत मुंबईमध्ये नुकताच एक स्टडी रिपोर्ट पुढे आलाय. या अभ्यासात ज्या तज्ज्ञांचा समावेश होता त्यांच्या मते, जे लोक ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल फोन वापरतात त्यांना ब्लड प्रेशरचा धोका फार जास्त असतो. तसेच डॉक्टरांच्या मते मोबाइलमधून निघणारी रेडियो फ्रिक्वेंसी हाय ब्लड प्रेशरचे सगळ्यात मोठे कारण आहे.

तज्ज्ञांच्या मते, मुंबईत राहाणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. चला तर जाणून घेऊया मोबाइल फोनच्या वापरामुळे कोणत्या प्रकारच्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो ते.

डोळ्यांना इजा - सतत मोबाईल वापरल्याने त्याचा तुमच्या डोळ्यावर परिणाम होतो. तुम्हाला जाणवत नसले तरी मोबाईलची नीळी स्क्रीन तुमच्या डोळ्यांना डॅमेज करू शकते. (Mobile Phone)

हाताचे दुखणे - कुठल्याही गोष्टी अतिवापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही सतत मोबाईल वापरल्यामुळे तुमच्या हाताला दुखणे जाणवू शकते.

स्पीपिंग पॅटर्न डिस्टर्ब होतो - उत्तम आरोग्यासाठी झोप फार महत्वाची आहे. उशीरा रात्रीपर्यंत मोबाइल चाळल्याने झोप येत नाही. (Health)

स्ट्रेस लेव्हल वाढते - मोबाइल फोनमुळेसुद्धा तुम्हाला तणाव येई शकतो. तुम्ही मोबाइलवर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर आणि पोर्टल्सवर काहीतरी बघत असता किंवा वाचत असता यामुळे तुमची स्ट्रेस लेव्हल वाढू शकते.