तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित राहण्यासाठी ही जबरदस्त ट्रिक फॉलो करा 

प्राजक्ता निपसे
शुक्रवार, 10 जुलै 2020

या जबरदस्त ट्रिक द्वारे करा तुमचा फोन ठेवा सुरक्षित 
तुमच्या परवानगीविना चालणार नाही 'अनलॉक' फोन, कोणती आहे ती जबरदस्त ट्रिक जाणून घ्या .

पुणे : तुम्ही रोजच्या आयुष्यात एका गोष्टीला खास स्थान आहे. ती चे नाव आहे स्मार्टफोन. याच स्मार्टफोनला स्मार्ट का म्हणतात ? याचे उत्तर तर कितीतरी लोकांना माहिती नाही.तुम्ही सहजपणे वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये अशा अनेक ट्रिक्स आहेत. जे कोणालाही माहिती नाही.तुमच्या स्मार्टफोनमधील काही महत्वाचे ॲप्स किंवा तुमच्या महत्त्वाच्या फाईल असतील तर त्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने उघडून पाहू नये, यासाठी या फोनमध्ये एक खास ट्रिक आहे.ते जाणून घ्या...
 
अँड्रॉइड स्मार्टफोनचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे यात अनेक प्रकारचे फीचर्स आणि वेगवेगळ्या सेटिंग्स असतात. काही असे  फीचर्स असतात. ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. ज्या व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतात त्यांच्यासाठी हे खास फीचर्स आहे. Pin the Screen (पिन द स्क्रीन) किंवा Screen Pinning (स्क्रीन पिनिंग) असे या फीचरचे नाव आहे. याच फीचरची आपण चर्चा करीत आहोत. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे फोन अनलॉक असला तरी कोणतीही व्यक्ती तुमच्या परमिशनशिवाय तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही. हे फीचर अँड्रॉइड 5.0 व्हर्जन आणि नंतर सर्वच प्रकारच्या स्मार्टफोन मध्ये मिळते.

फीचरची खासियत 
या पिन द स्क्रीन फीचरद्वारे तुम्ही कोणत्याही ॲपला स्क्रीनवर लॉक-पिन करू शकता. आणि जर का त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ॲपमध्ये जायचे असल्यास त्यासाठी लॉकस्क्रीन पासवर्डची गरज लागते. हे फीचर त्यावेळी खास ठरू शकते. काही कारणामुळे तुम्हाला तुमचा फोन अन्य दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावा लागत असेल, किंवा चूकुन कोणी तुमचा फोन वापरला तर. बरेचदा फोन दुसऱ्यांच्या हातात गेल्यास  ते लोक अनेक ॲप्स ओपन करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच अशा वेळी हे फीचर उपयोगी ठरते. म्हणजेच असे कि, तुमच्या परवानगी विना कोणत्याही व्यक्तीला फोनमधील कोणताही अ‍ॅप्स वापरता येणार नाही. 

पिन द स्क्रीन वापरण्यासाठी काही टिप्स 
१  सर्व प्रथम स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
२  आता सेटिंगच्या Security & Locations (सिक्युरिटी ॲन्ड लोकेशन्स)हा ऑप्शन निवडा. त्या ठिकाणी तुम्हाला Advanced (ॲडव्हान्सड) चा पर्याय दिसेल.
३  या पर्यायामध्ये तुम्हाला Screen Pinning (स्क्रीन पिनिंग)चे ऑप्शन दिसेल. ते तुम्ही सिलेक्ट करा. 
४  यावर टॅप केल्यावर तिथे फक्त ऑप्शन Off (ऑफ)असेल तर याला On (ऑन) करा.

हेही वाचा : अरे वाह ....आपल्या खिशातही मावेल असा AC आला आहे, त्याविषयी जाणून घ्याच.

५  आता ज्या ॲपला तुम्हाला पिन करायचे आहे. त्याला ओपन करा. परत Recent Apps (रिसेन्ट ॲप्स)च्या ऑप्शनवर जा.
६  आता मग ॲपवर लॉग इन प्रेस करा. आणि Pin(पिन)च्या ऑप्शनला निवडा.
७  परत दुसऱ्या ॲपवर जाण्यासाठी तुम्हाला Home (होम) आणि Back (बॅक) बटन एकसाथ सिलेक्ट करावे लागेल. यानंतर लॉकस्क्रीन पासवर्डचा वापर करावा लागेल.

हेही वाचा : Covid Umbrella तुम्ही पहिली का ?

अश्याप्रकारे काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुमचा फोन तुमच्या कंट्रोलमध्ये येईल. मग कोणीही तुमचा फोन वापरला तरीही तुमच्या महत्वाच्या फाईल्स आणि अ‍ॅप्स सुरक्षित राहतील हे नक्की.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile phones screen pinning feature do not let anyone open other apps of smartphone

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: