Mobile Ringtone : मनपसंद गाणं नाही तर तुमच्या नावाचीच ठेवा रिंगटोन, कसं ते जाणून घ्या l mobile ringtone on your name know how to make it technology app | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Ringtone

Mobile Ringtone : मनपसंद गाणं नाही तर तुमच्या नावाचीच ठेवा रिंगटोन, कसं ते जाणून घ्या

Mobile Ringtone : एक काळ असा होता की जेव्हा सगळीकडे रिंगटोनचा भारी ट्रेंड होता. कुठलेही गाणे ट्रेंड झाले की त्याची रिंगटोन बनवून फोनमध्ये सेट केली जायची. अनेक वेळा आपण अनोळखी व्यक्तीच्या फोनची रिंगटोन ऐकतो आणि ती आवडली की ती कुठून मिळेल ते शोधत बसतो.

अनेकवेळा आपण असे रिंगटोन देखील ऐकतो जिथे समोरच्या व्यक्तीचे नाव ऐकू येते. होय पण ती ऑनलाइन मिळणे एवढेही सोपे नाही. तेव्हा तुमच्या नावाची रिंगटोन कशी मिळवायची ते जाणून घ्या.

रिंगटोन दोन प्रकारे अगदी सहज बनवता येते.

App ने कशी तयार करायची रिंगटोन?

प्ले स्टोअरवर FDMR - Name Ringtones Maker App सर्च करा.

या अॅपच्या मदतीने तुमच्या नावाचे MP3 मध्ये रिंगटोनला बनवल्या जाऊ शकतं.

इंस्टॉल अॅपला ओपन करा.

यूजर्सला इथे ऑडिओ कनवर्टरही मिळतं. हा अॅप सगळ्याच फॉर्मॅट्सना सपोर्ट करतं.

तुमच्या नावाचा ऑडिओ रेकॉर्ड करा. त्यात गाण्याच्या फाइल्सही जोडता येतात.

रिंगटोन पुढे आल्यावर सेव्ह करा. (Mobile)

वेबसाइटवरून रिंगटोन तयार करा

अनेक थर्ड पार्टी अॅप्स आहेत जिथून रिंगटोन बनवता येते. तुम्हाला freedownloadmobileringtones वर जावे लागेल.

येथे तुम्हाला 'सर्च रिंगटोन्स'चे पर्याय दिसतील. तिथे तुमचे नाव शोधा.

तुमच्या नावाची रिंगटोन तेथे दिसेल ती ऐकल्यानंतर तुम्ही ती डाउनलोड करू शकता. (Application)

टॅग्स :TechnologyApp