Moto G 72: गुडन्यूज, Moto चा जबरदस्त G72 ‘या’ तारखेला होणार लाँच; किंमत आणि फीचर्स पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moto G 72

Moto G 72: गुडन्यूज, Moto चा जबरदस्त G72 ‘या’ तारखेला होणार लाँच; किंमत आणि फीचर्स पाहा

मोटोरोला कंपनी नेहमीच फोनच्या सिरीजमध्ये नविन फिचर्स देत असते. त्यामुळे मोटो कंपनीच्या फोनची चाहते वाट पाहत असतात. मोटोच्या चाहत्यांसाठी गुडन्युज आहे. एक नवीन स्मार्टफोन Moto G72 लवकरच भारतात लाँच करणार आहे. मोटोरोला आपल्या G सीरीजमधील नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. Moto G72  ही सिरीड असून तो येत्या 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता हा फोनला लाँच केले जाणार आहे. या फोनचे फिचर्स जाणून घेऊया.

हेही वाचा: होळी खेळताना Mobile, Gadgets ची अशी घ्या काळजी!

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये पीओएलईडी पंच होल डिस्प्ले दिले जाईल. या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 576 हर्ट्ज सँम्पिंलिंग रेट दिले जाईल. हा फोन स्क्रीन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नोलॉजी सोबत येईल. ज्यात 1300 निट्स ब्राइटनेस, डीसीआय पी 3 कलर आणि एचडीआर 10 सपोर्ट मिळेल. Moto G72 अँड्रॉयड 12 वर लाँच होईल.  

हेही वाचा: Science Wonder : उंदिर केळी नाहीतर, केळी उंदरांना पळवतात, सायन्सची कमाल

हा फोन ऑक्टाकोर प्रोसेसर सोबत मीडियाटेक हीलियो जी 99 चिपसेटवर काम करेल. या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिले जाणार आहे. बॅक पॅनेलवर एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक मायक्रो सेन्सर उपलब्ध असेल.

हेही वाचा: National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

Moto G72 मध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, एक अल्ट्रा-वाइड/डेप्थ सेन्सर आणि डेडिकेटेड मॅक्रो कॅमेरा असा ट्रिपल कॅमेरा असेल.  या फोनमध्ये डॉल्बी एटमॉस ट्यून केलेले डुअल स्पीकर असतील. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल. या फोनची किंमत 15 हजार इतकी असेल.