Moto च्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज, 624 रुपयांत घेऊन या घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

motorola cheapest 5g smartphone moto g62 first sale today in india check offers and discounts

Moto च्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनचा पहिला सेल आज, 624 रुपयांत घेऊन या घरी

तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आज पहिल्यांदाच भारतीय बाजारात Moto G62 5G ची विक्री सुरू होणार आहे हा सेल ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीचा हा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. चला तर मग या फोनशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या डिटेल्स आणि विक्रीसाठी उपलब्ध ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घेऊया..

Moto G62 मध्ये काय खास आहे?

हा Motorola फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे, जे 6 GB + 128 GB आणि 8 GB + 128 GB आहेत. त्याच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे .त्याच वेळी, त्याच्या 8 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी, तुम्हाला 19,999 रुपये खर्च करावे लागतील. या फोनवर कंपनी 1500 रुपयांची इंस्टट सूट देत आहे, जी तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास मिळेल. एचडीएफसी कार्डद्वारे ईएमआय व्यवहारावर तुम्हाला 1750 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, जर तुम्ही जिओ वापरकर्ते असाल तर तुम्हाला फोनच्या खरेदीवर 5049 रुपयांचा फायदा मिळेल. दुसरीकडे, जर तुम्हाला फोन आणखी स्वस्त खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला जुन्या फोनसाठी 17,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय, हा फोन 624 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी केला जाऊ शकतो.

हेही वाचा: Airtel Vs Jio Vs Vi : सर्व कंपन्यांचे दररोज 2GB डेटा प्लॅन, अमर्यादित कॉलिंग

Moto G62 5G चे स्पेसिफीकेशन्स आणि फीचर्स

या फोनला Qualcomm Snapdragon 695 5G SoC सपोर्ट देण्यात आला आहे. जे भारतात 5G कनेक्टिव्हिटीचे 12 बँड ऑफर करेल. फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.5-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल असून ज्यामध्ये 50MP प्रयामरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा दिला आहे. समोर एक 16MP सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेच्या मध्यभागी ड्रिल होल स्लॉटमध्ये बसवला आहे.

डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन IP52 रेटिंगसह येईल आणि फोनच्या बाजूला एक फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

हेही वाचा: मारुतीची नवीन Alto K10 लाँच; देते 25km मायलेज

Web Title: Motorola Cheapest 5g Smartphone Moto G62 First Sale Today In India Check Offers And Discounts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :5G Smart Phone