Motorola Smartphone : फक्त 1149 रुपयांना विकत घ्या 22,000 रुपयांचा 5G स्मार्टफोन , अशी होईल बचत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Motorola Smartphone

Motorola Smartphone : फक्त 1149 रुपयांना विकत घ्या 22,000 रुपयांचा 5G स्मार्टफोन , अशी होईल बचत

Motorola Smartphone : नवा फोन घेताना प्रत्येकालाच आपले पैसे वाचावे असं वाटतं. मग त्यासाठी आपण वेगवगळ्या वेबसाईटवर बंपर ऑफर्स शोधत बसतो. पण असे क्वचितच फोन असतात ज्यात तुम्हाला मोठमोठ्या ऑफर्स मिळतात. आता त्यातल्या त्यात नवा फोन म्हणजे Moto G62 5G मोबाईल फोन. हा नवा फोन फ्लिपकार्टवर तुम्ही केवळ 599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. थोडं विस्ताराने बघुया.

Motorola G62 5G ची भारतात किंमत

तर फ्लिपकार्टवर मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमत बघायचं झाल्यास 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज देणारा व्हेरिएंट 21,999 रुपयांना मिळतोय. पण जर त्यावर ऑफर लागू झाली तर तो 21,999 रुपयांऐवजी 14 हजार 999 रुपयांना मिळेल. आता फक्त 31 टक्के सूटच नाही तर बऱ्याच ऑफर्स तुम्हाला Moto G62 5G वर मिळतील.

फ्लिपकार्टची ऑफर

जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. शिवाय तुम्ही जुना फोन एक्सचेंज केल्यास 13 हजार 850 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.

Moto G62 5G चे फीचर्स

स्क्रीन : या फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच फुल-एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे, जो 405 पिक्सेल प्रति इंच पिक्सेल डेन्सिटीसह येतो.

कॅमेरा: सेल्फी फ्रंट कॅमेरा सेन्सर 16 मेगापिक्सेल आहे तर बॅक पॅनलवर कॅमेरा सेन्सर देण्यात आलेत. यात पहिला 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरची रेंज आहे.

बॅटरी: फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे. 20W फास्ट चार्जला सपोर्ट देण्यात आला आहे.

प्रोसेसर: फोनच्या स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Moto G62 मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU प्रोसेसर सेट करण्यात आलाय.