व्हॉट्‌सऍपवरही आता रिअल टाईम लोकेशन! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

"एण्ड टू एण्ड एनक्रिप्टेड फीचर'चा हा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एनक्रिप्टेड फीचरमुळे तुम्ही कुणासोबत लोकेशन शेअर करत आहात, तसेच किती वेळ ते शेअर करणार आहात यावर नियंत्रण ठेवून गुप्तता बाळगता येईल.

मुंबई - व्हॉट्‌सऍप वापरणाऱ्यांचे नेमके ठिकाण शोधण्याची सुविधा कंपनीने देऊ केली आहे. त्यामुळे मित्र, तसेच कुटुंबासोबत "रिअल टाईम लोकेशन' शेअर करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना मिळेल. बुधवारपासून ही लाईव्ह लोकेशनची सुविधा वापरकर्त्यांना देऊ करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या "कायझाला' या ऍप्लिकेशनमध्ये हे फीचर सर्वात आधी देण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टने कॉर्पोरेट कंपन्या, तसेच लघु-मध्यम उद्योजकांसाठी हे फीचर देऊ केले होते. 

"एण्ड टू एण्ड एनक्रिप्टेड फीचर'चा हा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एनक्रिप्टेड फीचरमुळे तुम्ही कुणासोबत लोकेशन शेअर करत आहात, तसेच किती वेळ ते शेअर करणार आहात यावर नियंत्रण ठेवून गुप्तता बाळगता येईल. लोकेशन शेअरिंग थांबवल्यावर हे फीचर आपोआप बंद होईल, असेही कंपनीने सांगितले. ज्या व्यक्तीला लोकेशन पाठवायचे आहे त्याच्यासोबतची "चॅट विंडो' ओपन करा. त्यातील "लोकेशन टॅब'मध्ये शेअर लाईव्ह लोकेशन हे फीचर आहे.

ग्रुपसाठीही हे फीचर वापरता येईल. मॅपच्या आधारे हे लोकेशन पाहता येईल, पण त्यासाठी तुमच्या मोबाईलचे जीपीएस ऑन ठेवावे लागेल. ग्रुपमध्ये एकाचवेळी अनेकांनी लोकेशन शेअर केले तर एकाच मॅपवर सगळी लोकेशन दिसतील, असेही व्हॉट्‌सऍपने स्पष्ट केले आहे. 

Web Title: mumbai news whatsapp Real Time Location