नेटवर्कसाठी ट्रायकडून माय स्पीड ऍप

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

नवी दिल्ली - नेटवर्कच्या गुणवत्तेची माहिती मिळविण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) माय स्पीड हे नवे ऍप विकसित केले आहे. या ऍपमुळे मिळणाऱ्या माहितीचा फायदा ग्राहक, धोरण ठरविणारे लोक आणि दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या या सर्वांनाच होणार आहे. 

या ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या नेटवर्कचे डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड कळणार असून, तो ट्रायपर्यंत पोचविण्याचा पर्याय येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही माहिती ट्रायला मिळाल्याने गैरप्रकार करणाऱ्या कंपन्यांवर आळा घालता येईल; तसेच सर्वांना समान नेटवर्क मिळेल अशी आशा आहे. 

हे ऍप आणि वायरलेस या दोन्ही नेटवर्कबद्दलही माहिती देण्यास सक्षम आहे. त्यामुळे युजर वापरत असलेल्या वाय-फाय डिव्हायसेसचे नेटवर्क स्पीडही समजू शकेल. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी पाहिलेल्या नेटवर्कची माहिती एका यादीमध्ये जतन करून ठेवली जाते, ती हवी तेव्हा पाहणेही शक्य आहे. नेटवर्कचे स्पीड येथे मेगा बिट्‌स पर सेकंदमध्ये (एमपीबीएस) दाखविण्यात आले आहे; तसेच वारंवार खराब नेटवर्क असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास लगेचच त्या सेवा पुरवठादारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ट्रायकडून सांगण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Speed App to check network strenght