पेगी व्हिटसन यांचा "अवकाश' विक्रम 

Sakal | Tuesday, 25 April 2017

वॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'च्या अवकाशवीर पेगी व्हिटसन (वय 57) यांनी अवकाशात सर्वाधिक दिवस व्यतित करण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी जेफ विल्यम्स यांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात एकूण 534 दिवस राहण्याचा विक्रम मोडला आहे. 

पेगी व्हिटसन यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. 2008 मध्ये त्या अवकाश स्थानकाच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या होत्या. याच वर्षी 9 एप्रिलला पेगी या अवकाश स्थानकाची जबाबदारी दुसऱ्यांदा सांभाळणाऱ्या पहिला महिला ठरल्या. मार्च महिन्यातही त्यांनी अवकाशात सर्वाधिक काळ चालण्याचा सुनीता विल्यम (50 तास 40 मिनीटे) यांचा विक्रम मोडत 53 तासांचा विक्रम प्रस्थापित केला होता. गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी एकूण 377 दिवस अवकाशात व्यतित केले होते. 17 नोव्हेंबरला त्या पुन्हा मोहिमेवर आल्या आणि आज त्यांनी जेफ विल्यम्स यांचा 534 दिवस दोन तास आणि 48 मिनिटांचा विक्रम मोडला. त्यांच्या सध्याच्या मोहिमेला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असून, त्या पृथ्वीवर परततील त्या वेळी त्यांच्या नावावर अवकाशात 650 हून अधिक दिवस राहिल्याचा विक्रम असेल.