अंतराळवीरांच्या जनुकांमध्ये आणि क्षमतेत बदल

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

अंतराळवीर स्कॉट केली याच्या शरीरातील जनुकांमधील फरकाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे. केली यांचा जवळजवळ वर्षभर अंतराळात मुक्काम होता. 

वॉशिंग्टन : अंतराळात प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांच्या जनुकांमध्ये व जैविक क्षमतेत बदल घडू शकतात, असा निष्कर्ष अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेने काढला आहे.

अंतराळवीर स्कॉट केली याच्या शरीरातील जनुकांमधील फरकाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे. केली यांचा जवळजवळ वर्षभर अंतराळात मुक्काम होता. 

स्कॉट यांचा जुळा भाऊ मार्क केली यांच्यातील जनुकांशी तुलना करून बदलाबाबतचे निष्कर्ष 'नासा'ने नोंदविले आहेत. स्कॉट अंतराळात जाण्यापूर्वी, गेल्यावर व परतल्यावर त्यांच्यातील जनुकांमध्ये बदल झाले असल्याचे आढळून आले आहेत. 
याबाबतचा प्राथमिक तपशील नासाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. केली यांनी 2015 ते 2016 दरम्यान अंतराळ कक्षेत व्यतीत केलेल्या 340 दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात बदल घडून आल्याचे निदर्शनास आले आहे, असे त्या तपशीलामध्ये म्हटले आहे. 
 

Web Title: NASA experiments reveal how Scott Kelly's genes changed in space