NASA ला अंतराळात पहिल्यांदाच सापडला अनोखा कोरोना

सूरज यादव
सोमवार, 20 जुलै 2020

एका मोठ्या ब्लॅक होलच्या चारही बाजुला असलेला कोरोना गायब झाल्यानतंर पुन्हा दिसू लागला आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने अंतराळात कोरोना शोधला आहे. तोसुद्धा असा कोरोना जो मधेच दिसेनासा होऊन पुन्हा दिसायला लागतो. या कोरोनाला पाहून नासाचे वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. कारण आतापर्यंत अंतराळात कोरोना गायब झाला तर तो पुन्हा दिसत नव्हता. मात्र यावेळी एका मोठ्या ब्लॅक होलच्या चारही बाजुला असलेला कोरोना गायब झाल्यानतंर पुन्हा दिसू लागला आहे. 

नासाच्या संशोधकांनी आपल्या आकाशगंगेच्या बाहेर एक ब्लॅक होल शोधलं. याच्या चारही बाजुला गडद नारंगी रंगाच्या गरम गॅसची लेअर आहे. या ब्लॅक होलपासून वेगानं एक्स रे ग्लो निघत आहे. पृथ्वीपासून हे 30 कोटी प्रकाशवर्ष दूर आहे. हा एक्सरे ग्लो पृथ्वीवरून पाहण्यासाठी दुर्बिनीचा वापर करावा लागतो. 

ब्लॅक होलच्या चारही बाजुला पांढऱ्या निळ्या रंगाचा कोरोना फिरत होता. हे ब्लॅक होलपेक्षा 100 पट जास्त गरम होतं. संशोधक हे पाहून तेव्हा हैराण झाले जेव्हा हा कोरोना गायब झाल्यानंतर पुन्हा दिसला. 

हे वाचा - खरंच पृथ्वीचा विध्वंस करू शकतात का Asteroid ? जाणून घ्या

ब्लॅक होल ज्या गॅलेक्सीमध्ये आहे त्याचं नाव 1ES 1927+654 असं आहे. या ब्लॅक होलच्या बाहेर फिरणारा कोरोना दर 40 दिवसांनी नष्ट होऊन परत येत आहे. संशोधकांना हे समजत नाही की यातून कोणता तारा तयार होत आहे का? किंवा तो तयार होण्याआधीच नष्ट होत आहे. 

चिलीतील सँटियागोतील डिएगो पोर्टल्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक क्लाउडिओ रिकी यांनी सांगितलं की, ब्लॅक होल्सच्या चारही बाजुला कोरोना असतो पण तो एकदा दिसायचा बंद झाला की पुन्हा दिसत नाही. मात्र या ब्लॅक होलचा कोरोना अपवाद आहे. हे समजून घेणं कठीण होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nasa found corona near black hole first time reappear