पुढील पंधरा वर्षात माणूस मंगळावर उतरणार; नासाची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

वॉशिंग्टन येथे आयोजित 'आएसी'च्या 70 व्या वार्षिक परिषदेला जगातील आठ अवकाश संशोधन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी (ता.21) ऑक्‍टोबरला झालेल्या चर्चासत्राला भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) विक्रम साराभाई अवकाश स्थानकाचे संचालक एस.सोमनाथ उपस्थित होते.

पुणे : ''माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले परंतु, रोज क्षितिजावर दिसणारा तांबड्या ग्रहावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न अधुरेच आहे. मंगळावर पाऊल ठेवण्याचे हे स्वप्न 2035 पर्यंत पूर्ण करण्याचा चंग अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने बांधला आहे. यासंबंधीची माहिती नासाचे संचालक जीम ब्रीडस्टाइन यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय परिषदेत (आएसी) दिली. No photo description available.

वॉशिंग्टन येथे आयोजित 'आएसी'च्या 70 व्या वार्षिक परिषदेला जगातील आठ अवकाश संशोधन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी (ता.21) ऑक्‍टोबरला झालेल्या चर्चासत्राला भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) विक्रम साराभाई अवकाश स्थानकाचे संचालक एस.सोमनाथ उपस्थित होते. नासाचे संचालक जीम म्हणाले,"आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मदतीने ही मोहीम आखण्यात येणार आहे. जर आपण चंद्रावर अंतराळयान उतरण्याची प्रक्रिया अधिक अद्ययावत केली तर, आपल्याला मंगळावरही माणूस उतरता येईल. माझ्या मते 2035 पर्यंत आपण हे शक्‍य करू.'' 

मंगळावर लवकरात लवकर नासाचा अंतराळवीर उतरावा यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नासाने जय्यत तयारी केली आहे. जास्त काळ मानवाला अंतराळात टिकता यावे, त्यासाठी आवश्‍यक अन्न उपलब्ध व्हावे आणि मंगळ दूर असल्यामुळे संभाषणात होणारा वेळेचा उशीर कमी करणे, यासंदर्भात नासाने प्रयत्न चालू केले आहे. अंतराळवीरांना प्रवासात विसावा घेता यावा यासाठी मंगळ आणि पृथ्वी दरम्यान अंतराळस्थानकाचा विचार शास्त्रज्ञांच्या डोक्‍यात आहे. 

चंद्रापर्यंतची मदत करणार भारत, पुढील मदतीसाठी संसाधनांचा अभाव 

या आंतरराष्ट्रीय परिषदेत महत्त्वाकांक्षी मोहिमेत जगभरातील अवकाश संशोधन संस्थांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या आहे. मात्र भारताने चंद्रापर्यंत जाण्यासाठी आवश्‍यक ती तांत्रिक आणि बौद्धिक मदतीची आश्वासन दिले. पुढील मदतीसाठी भारतातील संसाधने अपूर्ण असल्याचे इस्रोचे सोमनाथन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ''आम्ही मानवी संसाधनांच्या बाबतीत आघाडीवर आहे. आमच्याकडे उत्तम संशोधक आणि अभियंते आहेत. परंतु आमच्याकडे अवकाश संशोधनाशी निगडित आवश्‍यक औद्योगीक संस्था आणि संसाधने नाहीत. अमेरिकेपेक्षा आमची स्पेस इंडस्ट्री छोटी आहे.''

जागतिक सहकार्याने मोहिमेची आखणी 
मंगळावर माणूस पाठविण्यासाठी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये चर्चा झाली आहे. त्यामध्ये नवीन अंतराळ स्थानकाच्या निर्मितीवर भर देण्यात आला. तसेच जपानच्या 'एरोस्पेस ऍण्ड एक्‍स्प्लोरेशन एजन्सी'ने शुक्रवारी (ता.) नासासोबत याविषयासह चंद्रमोहिमांवर परस्पर सहकार्याची माहिती दिली. 

नासाचा सर्वात मोठा अवकाश भागीदार म्हणजे रशियाची रोस्कॉम संस्था. रशियाची ही संस्था लांबच्या उड्डाणांसाठी अवकाशयान तयार करते. रशियाचा नवीन चंद्रमोहीम अजूनही प्रगतीपथावर आहे. त्यासंदर्भात नासा आणि रशियात परस्पर सहकार्याची घोषणा करण्यात आली आहे. कॅनडियन अंतराळ संस्थेने याबद्दल कोणतीच भूमिका घेतलेली नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NASA will do expedition about man will land on Mars In the next fifteen years