Amazon-Flipkart वरून शॉपिंग करताय? तुमच्यासोबतही होऊ शकतो 'हा' स्कॅम; पाहा डिटेल्स | Online Shopping | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Shopping

Online Shopping: Amazon-Flipkart वरून शॉपिंग करताय? तुमच्यासोबतही होऊ शकतो 'हा' स्कॅम; पाहा डिटेल्स

Online Shopping Fraud: प्रमुख ई-कॉमर्स साइट्स Amazon आणि Flipkart वरून अनेकजण वस्तू खरेदी करत असतात. बंपर डिस्काउंट आणि आकर्षक ऑफरमुळे या साइट्सवरून खरेदी करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र, ऑनलाइन शॉपिंग करताना खबरदारी न घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

अनेकदा आपण वस्तूची डिलिव्हरी घेताना ओटीपी शेअर करतो. कंपन्यांनी सुरक्षितपणे वस्तूंची डिलिव्हरी व्हावी यासाठी ओटीपी शेअरिंग फीचर आणले होते. मात्र, आता या फीचरचा उपयोग फसवणुकीसाठी केला जात आहे. सायबर गुन्हेगारांनी ओटीपीच्या माध्यमातून फसवणुकीचे वेगळे माध्यम शोधले आहे.

हेही वाचा: Phone Charger: सरकारचा मोठा निर्णय, आता सर्व स्मार्टफोनसाठी एकच चार्जर; आदेश जारी

NCIB ने ट्विट करत दिली माहिती

National Crime Investigation Bureau ने ट्विट करत ग्राहकांना अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावध केले आहे. स्कॅमर्स ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवतात. हे सायबर गुन्हेगार यूजर्सकडे पार्सल घेऊन पोहचतात. चुकीचे पॅकेज निघाल्यानंतर ते परत करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते.

स्कॅमर्स एक लिंक पाठवून यूजर्सला ऑर्डर परत करण्यास सांगतात. त्यानंतर यूजर्सच्या फोनवर एक ओटीपी येतो. स्कॅमर्स यूजर्सकडून हा ओटीपी घेतात व फोनला हॅक करतात. फोनला हॅक अथवा क्लोन केल्यानंतर आर्थिक फसवणूक केली जाते. अशाप्रकारची फसवणूक तुमच्यासोबत देखील होऊ शकते. याबाबत NCIB ने ट्विट करत सावध केले आहे.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी ओटीपी कोणालाही शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगितल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. अनेकदा वस्तूच्या डिलिव्हरी वेळी ओटीपी शेअर करावा लागतो. मात्र, त्यावेळी तुम्ही वस्तू ऑर्डर केलेली असते. अशावेळी तुम्ही ओटीपी शेअर करू शकता.

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

बनावट मेसेज अथवा ईमेलच्या माध्यमातून आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. तसेच, ऑर्डर रद्द करण्यासाठी देखील अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ऑर्डर रद्द करण्यासाठी अधिकृत अ‍ॅपचा वापर करा.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'