WhatsAppमध्ये लवकरच इमेज स्टिकरमध्ये बदलवणारे फिचर येणार

WhatsApp
WhatsAppgoogle

औरंगाबाद - व्हाॅट्सअॅप मॅसेजिंग अॅप अगोदरच आयओएस आणि अँड्राॅईड युजर्ससाठी खूप साऱ्या फीचर्स देत आहे. आता फेसबुकची मालकी असलेल्या या व्हाॅट्सअॅपमध्ये लवकरच नवीन फिचर उपलब्ध होणार आहे. हे अनोखे व्हर्जन केवळ मोबाईल फोनपर्यंत मर्यादित नाही. ते तुम्हाला लॅपटाॅपमध्येही पाहायला मिळेल. WeBetaInfo च्या अहवालानुसार, इन्स्टंट मॅसेजिंग अॅप व्हाॅट्सअॅपमध्ये भविष्यात नवीन फिचर आणणार आहे. त्याच्या वापराने कोणत्याही इमेजला स्टिकरमध्ये बदलवता येणार आहे.

व्हाॅट्सअॅपचे नवे फिचर कसे काम करेल?

व्हाॅट्सअॅपच्या या आगामी फिचर कॅप्शन बारजवळ दिसेल, जेव्हा युजर्स नवीन फोटो पाठवण्यासाठी अपलोड करेल तेव्हा. स्टिकर आयकनला सिलेक्ट केल्यानंतर फोटो स्टिकरमध्ये बदलेल. सध्या हे फिचर टेस्टिंग स्टेजमध्ये असून सर्व परीक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध करुन दिले जाईल. हे फिचर डेस्कस्टाॅप व्हर्जनमध्येही उपलब्ध होऊ शकेल. हे फीचर २.२१३७.३ बीटा व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे.

व्हाॅट्सअॅपमध्ये हे नवीन फिचर्स येतायत

- व्हाॅट्सअॅपची लोकप्रियता लपून राहिलेली नाही. या अॅपचे इंटरफेस जितके सोपे आहे, तितकेच अधिक फिचर्स देण्यात आले आहेत.

- लवकरच अनेक नवीन फिचर्सही उपलब्ध होणार आहेत. त्यात वेगवेगळे फिचर्स असतील.

- व्हाॅट्सअॅपवर लवकर येणारे फिचर्सपैकी मॅसेजवर रिएक्शन, मल्टिडिव्हाईस सपोर्ट, डिसअपिअरिंग मोड आणि ९० दिवसानंतर ऑटोमॅटिक डिलिट होणे आदी फिचरचा समावेश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com