
एलोन मस्कनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करून नव्या ट्विटर फीचर्सची (Twitter Features) माहिती शेअर केलीये.
Twitter : Elon Musk आणणार नवं फीचर; 'ट्विटर'वर करता येणार Whatsapp प्रमाणं चॅट
ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी आता ट्विटरचं नवं फीचर इंट्रोड्यूस केलंय. कंपनीनं डायरेक्ट मॅसेज रिस्पॉन्डिंग फीचर (Direct Message Responding Feature) ऐनेबल करण्यासोबतच इतर अनेक फीचर्स लाँच करणार असल्याची घोषणा केलीये.
एलोन मस्कनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करून नव्या ट्विटर फीचर्सची (Twitter Features) माहिती शेअर केलीये. एलॉन मस्कनं ट्विट करून माहिती दिली आहे की, इंडीविज्यूअल डायरेक्ट मॅसेजला रिप्लायच्या फीचर व्यतिरिक्त, रिएक्शन इमोजी आणि एन्क्रिप्शन सारखे फीचर्स या महिन्याच्या अखेरीस आणले जातील. थोडक्यात तुम्हाला ट्विटरवर Whatsapp प्रमाणं चॅट करता येणार आहे.
मस्कच्या या ट्विटवर अनेक ट्विटर युजर्सनी आपलं मत शेअर करत ट्विट केलंय. एक ट्विटर युजर विचारतो की, सर्व फीचर आल्यावर आता आपण वापरत असलेल्या फीचरपेक्षा त्यात वेगळं काय असणार आहे? त्याच वेळी, दुसरा एक ट्विटर युजर म्हणतो, एलोन मस्क युजर्ससाठी जे नवीन फीचर आणत आहे, ते खरोखरच उत्तम आहे, चॅट एन्क्रिप्शन फीचर खूप महत्वाचं आहे.
एलॉन मस्कच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरनं लिहिलंय की, हे नवं फीचर्स खूप चांगलं आहे, तुम्ही डायरेक्ट मेसेजसाठी अनसेंड फीचर लागू करण्याचा विचार करा? गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये, एलोन मस्क म्हणाले होते की मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर युजर्ससाठी आपला अल्गोरिदम सुरळीत करण्यावर काम करत आहे.