नोकियाचा नवा स्मार्टफोन बाजारात येणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली ः नोकिया कंपनी आपला नवा स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे. हा स्मार्ट फोन 5 डिसेंबरला लॉंच करण्यात येणार आहे. परंतु या नविन स्मार्टफोनचे नाव काय असणार आहे. याबाबत नोकिया कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु या स्मार्टफोनचे नाव Nokia 8.2 असू शकण्याची शक्यता आहे.

नोकियाचा याआधीचा स्मार्ट फोन गेल्या वर्षी पाच डिसेंबरला कंपनीने आपला स्मार्ट फोन लॉंच केला होता. त्या स्मार्टफोनचं नाव 8.1 असं होतं. त्यामुळे कंपनी या फोनचं अत्याधूनिक वेरिएंट लॉंच करू शकतं. त्यामुळे त्याचं नाव 8.2 असू शकतं. असं सांगण्यात येत आहे. 

नोकिया कंपनी स्मार्टफोनच्या बाजारात सध्यातरी मागे पडली आहे. कंपनीच्या स्पर्धेत अनेक चीनी कंपन्या उतरल्या आहेत. अत्याधुनिक आणि तेही वाजवी दरात स्मार्टफोन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कंपनीला बाजारात पुन्हा आपला डंका वाजवण्यासाठी मोठ्या ताकदीने उतरण्याची गरज आहे. कंपनीच्या फोनची विश्वासहार्हता मोठी असली तरी, त्या गतीने बाजारात अत्याधुनिक स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात सध्यातरी मागे पडताना दिसत आहे. त्यामुळे नोकियाचा नवा स्मार्ट फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new smartphone of nokia in market